Next
कोल्हापुरात पूरग्रस्त मदत नियंत्रण कक्ष स्थापन
पूरग्रस्तांसाठी मदत जमा करण्याचे आवाहन
BOI
Saturday, August 10, 2019 | 04:21 PM
15 0 0
Share this article:


कोल्हापूर : ‘जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी जिल्हास्तरीय पूरग्रस्त मदत नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून, इच्छुक व्यक्ती आणि संस्थांनी या कक्षाकडे पूरग्रस्तांसाठी मदत करावी,’ असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले आहे.

‘दानशूर व्यक्ती आणि संस्थांना पूरग्रस्तांसाठी मदत करावयाची असल्यास त्यांनी जिल्हास्तरीय पूरग्रस्त मदत नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. या कक्षामार्फत पूरग्रस्त गावांची माहिती घेऊन त्यांच्या आवश्यकतेनुसार साहित्याचे वितरण करण्यात येईल,’ असे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सांगितले. 

या कक्षाच्या सनियंत्रण अधिकारी म्हणून जिल्हा पुरवठा अधिकारी राणी ताटे (मो. क्र ९६२३३ ८९६७३) व उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत अडसूळ (मो. क्र ९९२३० ०९४४४) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हा कक्ष सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद, कोल्हापूर येथे आहे. 

मदत नियंत्रण कक्ष :  दूरध्वनी क्रमांक : (०२३१)-२६५५४१६, व्हॉट्सॲप क्रमांक ९१३०० ५९५४२, मोबाईल क्रमांक ९४०३१४ ५६१११ 
ई-मेल : floodreliefkolhapur@gmail.com असा आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search