Next
आर्थिकदृष्ट्या दुर्बल-वंचित मुलांनी घेतले शास्त्रीय नृत्याचे धडे
प्रेस रिलीज
Saturday, April 27, 2019 | 04:45 PM
15 0 0
Share this article:


पुणे : शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्थेच्या (एसएनएसएस) वतीने आयोजित केलेल्या ‘डान्स सीझन २०१९’अंतर्गत नृत्यांजली संस्थेतर्फे आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित मुलांसाठी भरतनाट्यम्च्या नृत्य कार्यशाळेचे नुकतेच आयोजन केले होते. यात तब्बल १५० विद्यार्थ्यांनी नृत्याचा आनंद लुटला. 

शास्त्रीय नृत्य केवळ ठराविक गटापुरते मर्यादित न राहता सर्वसामान्य प्रत्येकापर्यंत पोहचावे या उद्देशाने शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्था स्थापना झाली. ‘नृत्यांजली’च्या गुरू वैशाली पारसनीस यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शाखेच्या ज्येष्ठ शिक्षिका व शिष्यांच्या सहकार्याने २० ते २८ एप्रिल दरम्यान ही कार्यशाळा आयोजित केली आहे.


सोमवारी (२९ एप्रिल) जागतिक नृत्यदिनाचे औचित्य साधत कर्वेनगर येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या सभागृहांमध्ये सायंकाळी सात वाजता या मुलांचा एकत्रित कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापक मंडळ सदस्या विद्या देशपांडे उपस्थित राहणार असून, ‘एसएनएस’च्या अध्यक्षा, प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना गुरू शमा भाटे, प्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगना व ‘एसएनएस’ सदस्या गुरू डॉ. सुचेता चापेकर यांची प्रमुख उपस्थिती असेल. हा कार्यक्रम सर्वांसाठी निःशूल्क खुला आहे. 

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 115 Days ago
Good idea . May it continue the activity . Best wishes
0
0

Select Language
Share Link
 
Search