Next
‘कर्तृत्वावर वेळोवेळी प्रोत्साहनाची थाप असावी’
‘आय पेरेंट्स’मध्ये शिवप्रसाद मंत्री यांचे प्रतिपादन
प्रेस रिलीज
Wednesday, December 12, 2018 | 04:18 PM
15 0 0
Share this story

पुणे : छत्रपतीं शिवाजी महाराज घडले ते जिजाबाईंनी दिलेल्या संस्कारांमुळेच. समान न्याय देण्याची वृत्ती आणि अन्याय करणाऱ्याला कठोर शिक्षा देण्याचे धाडस दिले याशिवाय राष्ट्राप्रती निष्ठा व आदरभाव, शौर्य, निडरता, कर्तव्यदक्षता अशा अनेक गोष्टींचे बाळकडू महाराजांना जिजामातांकडून मिळाले. यातूनच समजते, की एक प्रतिभावंत, कर्तृत्ववान व्यक्तिमत्व घडवण्यासाठी पालकांनाही तेवढेच परिश्रम घ्यावे लागतात. जिजामातांप्रमाणे कर्तृत्वावर वेळोवेळी प्रोत्साहनाची आणि मार्गदर्शनाची थाप घालणे आवश्यक आहे,’ असे प्रतिपादन शिवप्रसाद मंत्री यांनी केले.

आय पेरेंट्स सत्रांतर्गत गोयल गंगा इंटरनॅशनल स्कूलच्या आवारात हा कार्यक्रम नुकताच पार पडला. या वेळी गोयल गंगा इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका सोनू गुप्ता, मुख्याध्यापिका भारती भागवाणी, तसेच शिक्षक, विद्यार्थी आणि पालकही उपस्थित होते. जिजाऊंच्या अतुलनीय जीवनप्रवासातून प्रेरणा घेत पालकांची ‘पालकत्वाची’ जबाबदारी किती महत्वाची आहे याबद्दलही मंत्री यांनी पालकांना मार्गदर्शन केले.   

गुप्ता म्हणाल्या, ‘पालक हे मुलांचे पहिले गुरू असतात. त्यामुळे त्यांचे अनुकरण मुले करत असतात. म्हणूनच पालकांनी सकारात्मक गोष्टी स्वतःच्या अनुकारांतून मुलांना शिकवाव्यात.’ 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link