Next
कलाप्रावीण्यासाठीही अतिरिक्त गुण
BOI
Sunday, April 02, 2017 | 10:30 AM
15 0 0
Share this article:

प्रातिनिधिक फोटोपुणे : क्रीडा विषयासोबतच चित्रकला, लोककला, ललित कला, शास्त्रीय कला यांमध्ये प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांनाही गुणवाढीचा लाभ मिळणार आहे. दहावी व बारावीच्या अशा विद्यार्थ्यांना पाच ते २५ वाढीव गुण यंदाच्या परीक्षेपासूनच देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. अभ्यासासोबतच इतर कलाशिक्षणालाही महत्त्व असावे, यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. कला क्षेत्रातील कोणत्या कलाप्रकारासाठी वाढीव गुण देण्यात आले आहेत याचीही नोंद दहावी बारावीच्या गुणपत्रिकेत असेल.

मान्यताप्राप्त संस्थेमधून शास्त्रीय नृत्य, गायन-वादन शिकणारे विद्यार्थी, नाटकांचे प्रयोग व बालनाट्य करणाऱ्या, चित्रकलेसाठीची इंटरमिजिएट उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना हे वाढीव गुण मिळतील. हे गुण मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना २० एप्रिलपर्यंत आवश्यक ती प्रमाणपत्रे व अर्ज मुख्याध्यापकांकडे जमा करायचे आहेत. मुख्याध्यापकांनी अर्ज आणि प्रमाणपत्रांची शहानिशा करून ३० एप्रिलपर्यंत संबंधित विभागीय मंडळाच्या कार्यालयात ते जमा करायचे आहेत.

ही सवलत केवळ नियमित आणि बाहेरून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनाच मिळणार आहे. पुनर्परीक्षार्थी आणि श्रेणीसुधार योजनेअंतर्गत परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना ही सवलत मिळणार नाही. कोणत्याही पारितोषिकासाठी हे गुण ग्राह्य धरता येणार नाहीत, असेही शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search