Next
‘सुफी दरबार’मध्ये संगीतातून उलगडला मानवतावाद
प्रेस रिलीज
Monday, June 25, 2018 | 02:00 PM
15 0 0
Share this storyपुणे : अवामी महाज आयोजित ईद मिलन स्नेहमेळावा शनिवारी (२३ जून) सायंकाळी आझम कॅंपसमधील असेम्ब्ली हॉल येथे झाला. या वेळी समाजातील विविध मान्यवर, सर्वपक्षीय कार्यकर्ते, संस्थांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहून सामाजिक सलोख्याचे दर्शन घडवले.

या वेळी डॉ. कुमार सप्तर्षी, सामाजिक न्याय राज्य मंत्री दिलीप कांबळे, माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी, खा. वंदना चव्हाण, आमदार जयदेव गायकवाड, डॉ. उर्मिला सप्तर्षी, मोहन सिंह राजपाल, श्री. सय्यद, शमसुद्दीन तांबोळी, मोहन जोशी, डॉ. सतीश देसाई, दीप्ती चौधरी, चेतन तुपे, अभय छाजेड, अविनाश बागवे आदी मान्यवर उपस्थित होते.

अवामी महाजचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार, आबेदा इनामदार, लतीफ मगदूम, वाहिद बियाबानी, शाहीद शेख यांनी स्वागत केले. या वेळी अहमदनगर येथील नादब्रह्म संगीतालयातर्फे ‘सुफी दरबार’चे आयोजन केले होते. पवन श्रीकांत नाईक (अहमदनगर) यांच्या सुफी गायनाच्या कार्यक्रमाने वातावरणात रंगत आणली.

अल्लाहने (जिक्र) दरबारची सुरुवात झाली. मोहंमद प्रेषित पैगंबरांवरील तीन रचना सादर केल्या गेल्या. यामध्ये ‘फर्श पे रेहकर अर्श पे जाना’, ‘भर दो झोली मेरी या मोहंमद’, ‘जिक्रे एहमद से दिल को सजा लिजिए’, आध्यत्मिक तत्त्वज्ञानाची ‘बेखुद किए देते है’, प्रसिद्ध रचना ‘ख्वाजा मेरे ख्वाजा’, ‘फुल रही सरसो’ ही पारंपरिक हजरत आमीर खुसरो यांची रचना, ‘छास तिलक’, ‘तेरे वाज्जो’, ‘आफरीन- आफरीन’ या रचना सादर झाल्या. संत सोयराबाईंची ‘हरी भजनाविण काळ’ ही रचनाही या वेळी सादर करण्यात आली.

ईश्वरी तत्त्वज्ञान ते मानवतावाद असा सुफी सांप्रदायातील सुंदर प्रवास या मैफिलीच्या माध्यमातून उलगडण्यात आला. या मैफिलीत अरबी, उर्दू, पंजाबी, ब्रज, हिंदी अशा विविध भाषांमधून रचना सादर करण्यात आल्या. कल्याण मुरकुटे, नरसिंह देसाई, पंकज नाईक यांनी हार्मोनियमवर, कुलदीप चव्हाण (बेंजो), हर्षद भावे (तबला), विश्वजित कुलकर्णी (तबला, जंबे, डफ) यांनी नाईक यांना साथसंगत केली.

नाईक यांच्याबरोबर संकेत गांधी, पवन तळेकर, हरीश कुटे, अविनाश तिजोरे, नवरतन वर्मा, मुलांशु परदेशी, रिझवान शेख, विजय जाधव, सय्यद एहमद, उद्धव म्हस्के, भालचंद्र जाधव, संहिता परदेशी, उज्ज्वल कुलकर्णी यांनी सहगायन केले. कार्यक्रमाचे निवेदन वीणा दिघे यांनी केले. या सुफी दरबार विशेष मैफिलीदरम्यान सुफी तत्त्वज्ञानातील विविध रहस्य उलगडण्यात आली. उपस्थितांनी शीरखुर्मा, पुरणपोळी आणि दालचा या पदार्थांचा आस्वाद घेतला.

‘ईद मिलन हे सामाजिक सलोखा, संवादाचे माध्यम व्हावे, भेटीगाठी व्हाव्यात, संवाद व्हावा यासाठी हा उपक्रम आयोजित केला होता,’ असे डॉ. इनामदार यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link