Next
‘डॉक्टर्स डे’निमित्त दगडूशेठ हलवाई मंदिरात प्रार्थना
प्रेस रिलीज
Thursday, June 28, 2018 | 01:59 PM
15 0 0
Share this story

पुणे : ‘डॉक्टर्स डेनिमित्त एक जुलै रोजी पुण्यातील सर्व डॉक्टर्स संघटना एकत्र येऊन रुग्णांसाठी प्रार्थना करणार आहेत. या दिवशी सकाळी ७:३० वाजता श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती पुढे सर्व डॉक्टर्स व असोसिएशन्सचे सदस्य एकत्र येऊन प्रार्थना करणार आहेत,’ अशी माहिती साई स्नेह हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक व राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. सुनील जगताप यांनी दिली.

डॉक्टर व रुग्ण यांच्यातील संबंध दृढ होण्यासाठी ‘डॉक्टर्स डे’निमित्त डॉक्टर्स व असोसिएशन्सचे सदस्य विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती येथे सकाळी आठ वाजता गणपतीची आरती करून रुग्णांना आराम पडावा, सर्वत्र निरामय आरोग्य राहावे, यासाठी प्रार्थना करणार आहेत. आगामी उपक्रमांविषयी माहिती देण्यासाठी लगेचच पत्रकारांशी संवाद साधणार आहे.

या प्रार्थना उपक्रमात इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए, पुणे), पुणे डॉक्टर्स असोसिएशन्स (पीडीए), जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन (जीपीए), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी डॉक्टर सेल (पुणे), ​काँग्रेस डॉक्टर सेल (पुणे), आयएमए डॉक्टर असोसिएशन, ​​​​जनरल प्रॅक्टिस असोसिएशन (पुणे), डॉक्टर्स असोसिएशन्स ​​​​हडपसर, डॉक्टर असोसिएशन कोथरूड, डॉक्टर असोसिएशन, ​​​​शिवाजीनगर, भोई प्रतिष्ठान (डॉ. मिलिंद भोई), ​​​​सिंहगड डॉक्टर असोसिएशन, भाजप डॉक्टर सेल (डॉ. राजेंद्र खेडेकर), ​​​इंडियन डेंटल असोसिएशन (पुणे) व इतर संघटना सहभागी होणार आहेत. या वेळी वर्षभर एकत्रितपणे काम करण्याचा संकल्प करण्यात येणार आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link