Next
ठाण्यात रंगले वैचारिक वादळी कविसंमेलन
मिलिंद जाधव
Tuesday, September 11 | 12:30 PM
15 0 0
Share this story

ठाणे : कवितेतून आपले विचार मांडण्यासाठी आणि ज्येष्ठ कवी, तसेच नवीन कवींना विचारपीठ उपलब्ध करून देण्याच्या हेतूने शहरातील सुप्पारक कला संस्थेतर्फे धोबीघाट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात वैचारिक वादळी कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.

महापुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन करून कविसंमेलनाची सुरुवात करण्यात आली. या वेळी सुप्रसिद्ध कवी, गायक किरण सोनावणे, राजरत्न राजगुरू यांसह जगदेव भटू, नवनाथ राणखांबे, प्रज्ञेश सोनावणे, श्रीकृष्ण टोबरे, अनिल शिंदे, मनिषा मेश्राम, मंगेश सावंत, धनंजय सरोदे, पुष्पा शिरसाठ, विजय ढोकळे, विनोद गायकवाड, अशोक डोळस, सदाभाऊ बांबूळकर, हिंदुराव नांगरे, राजाराम दोंदे, सुखदेव कर्डक, श्रीधर शिंदे, नामदेव जगताप, अशोक भवार, सुमित्रा जावळे, मिलिंद जाधव या विविध ठिकाणांहून आलेल्या कवींनी स्वरचित दर्जेदार कविता सादर केल्या.

‘आपले विचार इतरांपर्यंत पोहोचविण्याचे साधन म्हणजे कविता. आपल्या कवितेच्या माध्यमातून समाज प्रबोधन झाले पाहिजे,’ असे विचार संस्थेचे अध्यक्ष, ज्येष्ठ कवी, गजलकार साजन शिंदे यांनी या वेळी व्यक्त केले.

संस्थेचे उपाध्यक्ष धनंजय सरोदे, सरचिटणीस अशोक डोळस, कोषाध्यक्ष हिंदुराव नांगरे, कार्याध्यक्ष नामदेव जगताप, कार्यलयीन सचिव आर्यन जानराव, संस्थेचे आदी पदाधिकारी उपस्थित होते. संमेलनाचे सूत्रसंचालन अशोक भवार यांनी केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link