Next
‘एगॉन’च्या ‘सीओओ’पदी साबा आदिल
प्रेस रिलीज
Wednesday, June 13, 2018 | 02:52 PM
15 0 0
Share this story

मुंबई : ऑनलाइन इन्श्युरन्समध्ये अग्रेसर असलेल्या एगॉन लाइफ इन्श्युरन्स चिफ ऑपरेटिंग ऑफिसरपदी (सीओओ) साबा आदिल यांची नियुक्ती केली असल्याची घोषणा केली. कंपनीची धोरणात्मक उद्दिष्टे आणि कामकाजाच्या योजनांना गती देण्यासाठी मे २०१८मध्ये त्यांच्याकडे ही सूत्रे सोपविण्यात आली आहे. या नव्या जबाबदारीबरोबरच साबा चीफ पीपल ऑफिसरचा कार्यभारही सांभाळतील.

ग्राहकांना सर्वोत्कृष्ट आणि अभिनव असे समाधान देण्याची नवी भूमिका साबा यांना पार पाडावी लागणार असून, त्यांना व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱी यांना रिपोर्ट करावे लागेल.

या नियुक्तीबद्दल माहिती देताना एगॉन लाइफ इन्श्युरन्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विनीत अरोरा म्हणाले, ‘साबा आदिल यांची सीओओपदी नियुक्ती करताना आम्हाला आनंद होत आहे. मनुष्यबळ विकास, प्रकल्प व्यवस्थापन, ग्राहकांबद्दलचे मर्मज्ञान आणि ऑपरेशन्स असा १८हून अधिक वर्षांचा बहुविध अनुभव त्यांच्या गाठीशी असून, हा अनुभव एगॉन लाइफ इन्श्युरन्ससाठी तो अत्यंत पूरक आणि मौल्यवान असाच ठरणार आहे. नाविन्यपूर्ण डिजिटल उपक्रम राबविताना त्यांनी परिवर्तनीय भूमिका बजावली आहे. लोकांच्या कोअर ग्रुपला बरोबर घेऊन त्यांनी अतिशय विचारपूर्वक व्यवसायाचे धोरण आखून त्याची अंमलबजावणी केली आहे. शिवाय ग्राहकांमार्फतच अभिनव उपक्रम देखील त्यांनी अलीकडे सुरू केले. साबा या सुरुवातीपासूनच एगॉन लाइफ परिवाराचाच एक हिस्सा आहेत आणि त्यांना या नव्या भूमिकेत पाहताना आम्हाला आनंद होत आहे. कंपनीच्या विकासात त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण राहील, याची आम्हाला खात्री आहे.’

साबा आदिलआपल्या नव्या भूमिकेबद्दल चीफ पीपल आणि ऑपरेटिंग ऑफिसर साबा आदिल म्हणाल्या, ‘आयुर्विमा क्षेत्रात ‘एगॉन लाइफ’ने गेल्या काही वर्षांत डिजिटल तज्ञ्ज म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. आम्ही सातत्याने आमच्या कारभारात नाविन्य आणण्याचा प्रयत्न करीत असतो आणि आमच्या ग्राहकांना लाभ मिळावा, असा स्पष्ट दृष्टीकोन आणि धोरण आम्ही निर्धारित केले आहे. आपल्या या नव्या जबाबदारीबद्दल मी खूप उत्साही असून आमच्या विकासाच्या या चढत्या आलेखात धोरणात्मक सहभाग असेल.’

साबा या २००७ मध्ये संस्थापक सदस्य म्हणून कंपनीत रुजू झाल्या आणि तेव्हापासून चांगली संस्कृती रुजविण्यात, संघटनेत सुसूत्रता आणून त्यात कंपनी मूल्य निर्माण करण्यात, मजबूत असा कर्मचारीवर्ग तयार करण्यात आणि भविष्यात विश्वासार्ह कंपनी अशी ओळख व्हावी, म्हणून सक्षम बांधणी करण्यात त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग राहिला आहे. त्यांच्या कार्यशैलीबद्दल त्यांचा गौरवही करण्यात आला असून, या क्षेत्रातच नव्हे तर, बाहेरही त्यांची एक वेगळी ओळख आहे. त्यांनी सायन्समध्ये पदवी, तर मनुष्यबळ व्यवस्थापनात पदव्युत्तर पदवी मिळविली आहे. याशिवाय स्टॅनफोर्डच्या एलईएडीमार्फत कॉर्पोरेट इनोव्हेशन सर्टिफिकेट प्रोग्रॅमही त्यांनी केला आहे.

‘एगॉन लाइफ इन्शुरन्स’विषयी :
नवा दृष्टीकोन असलेली आयुर्विमा कंपनी म्हणून जुलै २००८मध्ये एगॉन लाइफ इन्श्युरन्स कंपनी लिमिडेटचे कार्य भारतभरात सुरू झाले. परिपूर्ण उत्पादने, अत्याधुनिक तंत्रज्ञान, ग्राहकोपयोगी सल्ला आणि ग्राहकांचे पूर्ण समाधान याच्या आधारावर आपला हा दृष्टीकोन साध्य करण्यावर कंपनीचा भर आहे.

जगातील आघाडीची वित्तीय संस्था असलेली एगॉन कंपनी आयुर्विमा, निवृत्तीवेतन, तसेच अॅसेट मॅनेजमेंट पुरविते. ‘एगॉन’ आणि भारतातील प्रसार माध्यमातील प्रमुख समूह असलेल्या बेनेट, कोलमन अॅंड कंपनीने एकत्रितपणे एगॉन लाइफ इन्श्युरन्स कंपनी सुरू केली. ग्राहकांना दीर्घ मुदतीचा आर्थिक लाभ मिळावा, या उद्देशाने स्थानिक गरजांचा विचार करून जागतिक स्तरावरील अनुभवाच्या आधारे उत्पादने बाजारात आणण्याचे धोरण या कंपनीने अवलंबिले आहे. या कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून, देशभरात ४.४ लाखांहून अधिक ग्राहक आहेत.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link