Next
अंगणवाडी सेविकांवरील ‘मेस्मा’ रद्द
प्रेस रिलीज
Friday, March 23 | 12:57 PM
15 0 0
Share this story

आमदार धनंजय मुंडेमुंबई : राज्यातील अंगणवाडी सेविकांवर लावलेल्या मेस्मा कायद्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सभागृहात आवाज उठवला. २१ मार्च रोजी मेस्मा रद्द करण्याच्या मुद्द्यावरुन सभागृहाचे कामकाजही बंद पडले होते.

अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व विरोधी पक्षाच्या आमदारांच्या दबावापुढे सरकार झुकले असून, ‘मेस्मा’ कायदा रद्द करावा लागला आहे. ‘सरकारला हे उशिरा सुचलेले शहाणपण असले, तरी या विषयावर सरकारने चार दिवस वाया घालवले. यापुढे ही आम्ही अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांसाठी लढत राहू,’ असे आश्वासन धनंजय मुंडे यांनी दिले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link