Next
‘एबीआयएल’ उभारणार लंडनमध्ये आलिशान हॉटेल
प्रेस रिलीज
Wednesday, June 06, 2018 | 12:01 PM
15 0 0
Share this article:

ट्रॅफलगर स्क्वेअर, लंडन

पुणे : प्रसिद्ध उद्योगपती अविनाश भोसले यांनी स्थापन केलेल्या पुणे स्थित ‘एबीआयएल’ समुहाने आपल्या हॉस्पिटॅलिटी व्यवसायाच्या विस्तारात जागतिक स्तरावर मजल मारली आहे. एबीआयएलने मध्य लंडनमधील ट्रॅफलगर स्क्वेअर येथील अत्यंत मोक्याच्या जागी असलेली मिळकत विकत घेतली असून, या ठिकाणी दोनशेहून अधिक खोल्या असलेले आलिशान पंचतारांकित हॉटेल उभारण्यात येणार आहे.

अमित भोसले
या जागेचा व्यवहार नुकताच पूर्ण झाला आहे. अविनाश भोसले यांचे पुत्र अमित भोसले हे एबीआयएल समुहाचा हॉस्पिटॅलिटी व्यवसाय सांभाळतात. एकत्रित सुमारे एक हजार खोल्या असलेल्या सेंट रेजीस (मुंबई), डब्ल्यू (गोवा), वेस्टिन (पुणे) आणि ल मेरिडियन (नागपूर) या पंचतारांकित हॉटेल्सच्या मालकीसह समुहाने हॉस्पिटॅलिटी व्यवसायातील आपली घोडदौड कायम राखली आहे. सेंट रेजिस आणि डब्ल्यू हे हॉटेल व्यवसायातील सर्वोच्च समजले जाणारे ब्रँड भारतात सर्वप्रथम आणण्याचे श्रेय देखील अमित भोसले यांनाच जाते.    

अमित भोसले म्हणाले, ‘लंडनमधील ही जागा ‘ब्लॅकरॉक यूके प्रॉपर्टी फंड’कडे होती. ट्रॅफलगर स्क्वेअर येथे असलेल्या या जागेची १.५ लाख चौरस फूट इतकी विकसन क्षमता असून, ‘एबीआयएल’ समुहाने ही जागा ९७ दशलक्ष पाऊंड खर्चून, (सुमारे ८५० कोटी रुपये) जागतिक निविदा प्रक्रियेतून खरेदी केली आहे. या ठिकाणी दोनशे हून अधिक खोल्या असलेले एक आलिशान पंचतारांकित हॉटेल बांधण्याचा समुहाचा विचार असून, त्याच्या ‘ब्रँड टायअप’साठी आघाडीच्या हॉटेल व्यवस्थापन कंपन्यांशी लवकरच बोलणी सुरू करण्यात येतील. पुढील वर्षाच्या मध्यावर या हॉटेलचे बांधकाम सुरू करण्याचे नियोजन आहे.’

‘लंडन हे अतिशय सुंदर शहर असून, गेली अनेक वर्षे वेळोवेळी येथे येत असल्यामुळे या शहराबद्दल आपल्याला चांगली माहिती झाली आहे. त्यामुळे, तसेच हॉस्पिटॅलिटी व्यवसायात असलेल्या उत्तम संधीमुळे ‘एबीआयएल’ समुहाच्या भारताबाहेरील पहिल्या प्रकल्पासाठी लंडनचीच निवड केली’, असेही अमित भोसले यांनी सांगितले.  
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search