Next
नॉरा एफ्रन
BOI
Saturday, May 19 | 03:45 AM
15 0 0
Share this story

हॅरी मेट सॅली, स्लीपलेस इन सिएटल आणि यू हॅव गॉट मेल यांसारखे सुपरहिट सिनेमे लिहिणाऱ्या नॉरा एफ्रनचा १९ मे हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये तिचा अल्प परिचय...
....
१९ मे १९४१ रोजी न्यूयॉर्कमध्ये जन्मलेली नॉरा एफ्रन ही पत्रकार, लेखिका, नाटककार, पटकथाकार आणि सिनेदिग्दर्शिका म्हणून प्रसिद्ध आहे. 

नाटककार आणि पटकथाकार आई-वडील लाभल्यामुळे तिला लेखनाचं बाळकडू घरातूनच मिळालं होतं. तिच्या आई-वडिलांनी तिचं नावही इब्सेनच्या ‘डॉल्स हाउस’मधल्या प्रमुख व्यक्तिरेखेवरून ठेवलं होतं. तिच्या दोन लहान बहिणीसुद्धा पटकथाकार आहेत. एकाच कुटुंबातले सर्वजण लेखनात मग्न असण्याचं हे उदाहरण तसं दुर्मिळच.

सुरुवातीला पत्रकार म्हणून तिने ‘पोस्ट’, ‘एस्क्वायर’ आणि ‘मोनॉकल’मधून लेखन केलं. पुढे १९८२ साली तिच्याच ‘हार्टबर्न’ कादंबरीवर मेरिल स्ट्रीप आणि जॅक निकल्सनचा सिनेमा बनला आणि गाजला. १९८३ साली तिने लिहिलेल्या ‘सिल्कवूड’च्या पटकथेसाठी तिला ऑस्कर नॉमिनेशन मिळालं आणि पुढे १९८९ सालच्या तिच्या ‘हॅरी मेट सॅली’साठी सुद्धा तिला ऑस्कर नॉमिनेशन मिळालं. हा सिनेमा ‘ऑल टाइम ग्रेट रोमॅन्टिक कॉमेडी’मध्ये गणला जातो. पाठोपाठ १९९३ साली तिने लिहून दिग्दर्शित केलेला ‘स्लीपलेस इन सिएटल’ सिनेमा तुफान गाजला.  त्यानंतर १९९८ साली तिने ‘यू हॅव गॉट मेल’ लिहून दिग्दर्शित केला होता. तो प्रचंड चालला आणि अफाट लोकप्रिय झाला. २००९ सालच्या तिने लिहून दिग्दर्शित केलेला आणि मेरिल स्ट्रीपने अभिनय केलेला ‘ज्युली अँड जुलिया’ हा सिनेमासुद्धा हिट झाला आणि तिचं कौतुक झालं. 

तिने लिहिलेली ‘इमॅजिनरी फ्रेंड्स’ आणि ‘लव्ह, लॉस अँड व्हॉट आय वोअर’ ही नाटकं रंगभूमीवर गाजली.

आय रिमेम्बर नथिंग, आय फील बॅड अबाउट माय नेक, क्रेझी सलाड, स्क्रीबल स्क्रीबल, वॉलफ्लॉवर अॅट दी ऑर्जी, अशी तिची अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत.

२६ जून २०१२ रोजी तिचा न्यूयॉर्कमध्ये मृत्यू झाला.

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link