Next
ठाण्यात शिवरात्रीनिमित्त आरोग्य शिबिर व सरबत वाटप
दत्तात्रय पाटील
Thursday, March 07, 2019 | 02:45 PM
15 0 0
Share this article:ठाणे : मुरबाड तालुक्यातील पवित्र तीर्थक्षेत्र समजल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र संगमेश्वर येथे जिल्हाभरातून येणाऱ्या शिवभक्तांसाठी धर्मवीर युवा प्रतिष्ठानतर्फे आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते; तसेच फराळ व सरबत वाटप करण्यात आले होते. प्रतिष्ठानतर्फे गेली आठ वर्ष हे कार्य अखंडितपणे सुरू आहे.

आरोग्य शिबिराचे उद्घाटन श्रीक्षेत्र संगमेश्वर येथील शंकराचार्य मठाचे मठाधिपती सत्यानंद स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरात प्रतिष्ठानचे सल्लागार डॉ. अजित पोतदार यांच्या मार्गदर्शनाखाली ९५ जणांची दंतरोग, ७० जणांची कानांची, ८७ जणांची नेत्र, ३६ जणांची रक्त, तसेच ३२ जणांची मुखरोग अशी एकूण ३२० रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्याचप्रमाणे शिवभक्तांची सेवा घडावी म्हणून प्रतिष्ठानतर्फे फराळ आणि सरबताचे वाटप करण्यात आले. एक हजार २०० ग्लास सरबत आणि ३५ किलो वेफर्सचे वितरण या वेळी करण्यात आले.या प्रसंगी जिल्हा परिषदेचे सदस्य राजेंद्र विशे, श्यामकांत पतंगराव, दिनेश पाचघरे, नितीन ठाकरे, विश्वजित घायवट, अतुल भोईर हे सर्व पत्रकार, पोलीस कर्मचारी श्री. सुरोशे, श्री. शिरसाट, रघुनाथ दिनकर, संदीप निमसे, काळुराम बांगर, तुकाराम बांगर, चिंतामण भावार्थे, गणेश भावार्थे, शिवव्याख्याते नवनीत यशवंतराव आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धर्मवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोमनाथ धिर्डे, कार्याध्यक्ष प्रकाश पतंगराव, खजिनदार जितेंद्र दवणे, संपर्कप्रमुख रवींद्र खाडे, सचिव गणेश चौधरी, प्रसिद्धीप्रमुख पंढरीनाथ ढमके, संपर्कप्रमुख जयवंत हरड, मढ संपर्कप्रमुख चंद्रकांत गायकर, सदस्य मयूर देशमुख, सतीश भालेराव, उल्हास विशे, अमित यशवंतराव, दयानंद पाटोळे, हरीश कोंगेरे, बंदू शिंदे, सागर पितांबरे, पंढरीनाथ निमसे, सागर गायकर आदींनी मेहनत घेतली; तसेच शंकराचार्य मठातील सेवकांचेही सहकार्य लाभले. भगवान हरी विशे यांनी सूत्रसंचालन केले.

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search