Next
किमया
BOI
Saturday, August 19, 2017 | 04:30 PM
15 1 0
Share this story


पावसामुळे वातावरण कसं बदलून जातं याचं चित्रमय वर्णन मंगेश पाडगावकर यांनी ‘किमया’ या कवितेत केलंय. ‘कवितांचा श्रावण...श्रावणाच्या कवितामध्ये आज त्याच कवितेचा आस्वाद घेऊ या.
...........
उभारून कर उभे माड हे 
शिरीं वीरांपरी झेलीत वृष्टी
जरा पहावे क्षितिजावर तर
बुडून जाते धुक्यात दृष्टी

हिरवी झाडे - शामल डोंगर
धूसर निळसर तलम हवा ही
लाल गढूळ जलांतून वाहे
उसळत खिदळत चंचल काही

भिजून गेलें पंख तरीही
बसला तारांवरती पक्षी
मधेच ठिबके थेंब कोवळा
फुलवित जळी वलयांची नक्षी

मिचकावीत केशरी पापणी
कुठे दूरच्या ज्योती हसती
कुठे घरांच्या कौलारांवर 
गुच्छ धुरांचे झुलती...भिजती

छेडी सुरावट मल्हाराची
धारांच्या तारांवर वारा
लख्ख विजेच्या प्रतिबिंबाचा
जळात गोठून झाला पारा

ध्वज मिरवीत काजळी धुराचा
आगगाडी ये दुरून उत्सुक
खडखड धडधड आज तिची पण
भिजून झाली हळवी नाजूक
- मंगेश पाडगावकर
 
15 1 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link