Next
स्मार्टरॉनचा टीफोन पी
प्रेस रिलीज
Saturday, January 13, 2018 | 11:07 AM
15 0 0
Share this article:

मुंबई : ‘स्मार्टरॉन’ या भारताच्या पहिल्या जागतिक तंत्रज्ञान ‘ओईएम’ व प्रिमिअर आयओटी ब्रँड असलेल्या कंपनीने ‘टीफोन पी’ हा त्यांचा किफायतशीर दरातील स्मार्टफोन बाजारात दाखल केला आहे. आठ हजार रुपयांमध्ये दर्जात्मक वैशिष्ट्ये समाविष्ट असलेला हा स्मार्टफोन फ्लॅश सेलच्या माध्यमातून १७ जानेवारी रोजी दुपारी बारानंतर स्टॉक संपेपर्यंत फक्त फ्लिपकार्टवर उपलब्ध असणार आहे.  

टीफोन पी या स्मार्टफोनमध्ये पाच हजार एमएएच क्षमतेची बॅटरी आहे. यामुळे एका चार्जमध्ये फोन दोन दिवसांपेक्षा अधिक काळपर्यंत चालतो. हा फोन एक आठवडाभर स्टँडबाय मोडवर चालू राहू शकतो. हा स्मार्टफोन ओटीजी फंक्शनच्या माध्यमातून स्मार्टफोन्स, स्मार्टबँड्स, स्पीकर्स अशी इतर डिव्हाइसेसदेखील चार्ज करतो. या स्मार्टफोनची रचना आकर्षक असून, ५.२ इंच एचडी डिस्प्ले आहे. 

या स्मार्टफोनमध्ये शक्तिशाली क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ४३५ ऑक्टा कोअर चिपसेट प्रोसेसरसोबत तीन जीबी रॅम आहे. हा स्मार्टफोन युजर्सना अँड्रॉईड एनवरील सर्वोत्तम कामगिरी देतो. या स्मार्टफोनमध्ये ३२ जीबीचे इनबिल्ट स्टोअरेज आहे (जे १२८ जीबीपर्यंत वाढवता येते) आणि फोनमधील ट्रॉनएक्स वैशिष्ट्यासह युजर्सना अतिरिक्त १००० जीबीचे फ्री टीक्लाऊड स्टोअरेज मिळते. ज्यामुळे युजर्सना डिवाईसमधून कोणताही डेटा डिलिट करण्याची गरज नाही. युजरचा अनुभव वृद्धिंगत करण्यासाठी टीफोन पी या स्मार्टफोनमध्ये ऑटोफोकससह प्रगत १३ मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि लो लाइट फ्लॅश व ब्युटिफिकेशन मोड्ससह पाच मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहेत. टीफोन पीमध्ये फिंगरप्रिंट सेन्सरचे वैशिष्ट्य आहे. हे वैशिष्ट्य युजर्सना त्यांच्या फोन्ससाठी जलद व खात्रीशीर अॅक्सेसची सुविधा देते आणि एका टॅपमध्ये फोटो काढण्याची किंवा कॉल्स घेण्याची सुविधा देते.
टीफोन पी स्मार्टरॉनच्या ‘पॉवर्ड बाय ट्रॉनएक्सत्र’ प्रोग्राम अंतर्गत तयार करण्यात आला आहे. हा प्रोग्राम आमच्या सर्व डिवाइस भागीदारांना टीक्लाऊड, टीकेअर व टीस्टोअर उपलब्ध करून देतो.

या फोनबाबत बोलताना स्मार्टरॉनच्या विक्री व विपणन विभागाचे उपाध्यक्ष अमित बोनी म्हणाले, ‘बहुआयामी, सतत अग्रेसर असलेल्या आणि जगातील घडामोडींबाबत जागरुक असलेल्या भारतीय ग्राहकांच्या वाढत्या मागण्यांना उद्देशूनच हा टीफोन पी दाखल करण्यात आला आहे. भारतीय ग्राहक कोणतीही तडजोड न करता किफायतशीर दरातील व सर्वोत्तम वैशिष्ट्यांनी युक्त फोनचा शोध घेत असतो. आम्ही टीफोन पीमध्ये शक्ती व आकर्षकतेची भर केली आहे.’

फ्लिपकार्टमधील मोबाइल्स विभागाचे वरिष्ठ संचालक अय्यप्पन राजगोपाल म्हणाले, ‘आम्हाला फक्त फ्लिपकार्टवर उपलब्ध असणारा टीफोन पी दाखल करताना खूप आनंद होत आहे. तसेच आम्हाला आमच्या ग्राहकांना वाजवी दरातील सर्वोत्तम स्मार्टफोन देताना देखील खूप आनंद होत आहे. आम्ही ग्राहकांना अधिक नाविन्यपूर्ण, उच्च दर्जाची वैशिष्ट्ये आणि संपन्न अनुभव देणारे डिवाइस उपलब्ध करुन देण्याचा निर्धार केला आहे. यामुळे ते आमच्या ब्रँडशी कायमस्वरुपी संलग्न राहतील आणि या विभागातील बाजारपेठेमधील आमची अग्रेसर उपस्थिती कायम राहील.’

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search