Next
कसबा संस्कार केंद्रातर्फे मुलांसाठी संस्कार वर्ग
BOI
Saturday, June 15, 2019 | 12:04 PM
15 0 0
Share this article:



पुणे :
  'श्रुतिसागर आश्रम, फुलगाव संचलित कसबा संस्कार केंद्राच्यावतीने मुलांवर चांगले संस्कार व्हावेत यासाठी वर्षभर दर रविवारी संस्कार वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. हे वर्ग कसबा पेठेतील शिंपी आळी येथील श्री संत नामदेव शिंपी दैव मंदिर सभागृह येथे सकाळी ८.३० ते १० या वेळेत होतील,' अशी माहिती संस्कार वर्गाचे संचालक अनिल दिवाणजी यांनी दिली. 

'या संस्कार वर्गामध्ये श्लोक पठण, भगवद्गीतेचा बारावा अध्याय;तसेच चित्रकला, हस्तकला, मेहंदी अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. नागपंचमी, गणेशोत्सव, दिवाळी इतर विविध सण सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक उपक्रमांच्या माध्यमातून एकत्र येऊन साजरे केले जातात. वर्षभर मुलांना सामाजिक, शैक्षणिक गोष्टींचीही माहिती देण्यात येणार आहे,' असेही त्यांनी सांगितले.

संस्कार वर्गाकरिता वार्षिक ३०० रुपये इतके देणगी शुल्क आहे. नावनोंदणी अथवा अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा.
 
अधिक माहितीसाठी संपर्क : ९४२२३ १८०३७
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search