Next
एपिलेप्सीग्रस्त मुला-मुलींसाठी विवाहविषयक कार्यशाळा
BOI
Friday, January 18, 2019 | 05:05 PM
15 0 0
Share this story

पुणे : संवेदना फाउंडेशन, या एपिलेप्सी व्याधीसाठी गेली पंधरा वर्ष अविरत काम करणाऱ्या संस्थेने, रविवारी, २० जानेवारी २०१९ रोजी एपिलेप्सीसहित जगणाऱ्या लग्नाळू वयाच्या मुलामुलींसाठी एक कार्यशाळा आयोजित केली आहे. निवारा वृद्धाश्रम येथे ही कार्यशाळा होणार असून, यात मेंदूतज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ व विवाह समुपदेशक मार्गदर्शन करणार आहेत. 

याबाबत अधिक माहिती देताना संवेदना फाउंडेशनच्या संस्थापक संचालक, यशोदा वाकणकर म्हणाल्या, ‘एपिलेप्सी म्हणजेच फिट येणे. या व्याधीबद्दल आपल्या समाजात अजूनही गैरसमज दिसतात. औषधपचाराने ही व्याधी पूर्णपणे आटोक्यात राहू शकते. समुपदेशनाचाही खूप फायदा होतो, हे अनेकांना माहिती नसते. याबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी संवेदना फाउंडेशन २००४ पासून विविध माध्यमांतून काम करत आहे. एपिलेप्सीचा इतिहास असलेल्या व्यक्तीचे नेहमीच्या वधूवर मंडळामध्ये लग्न जमणे ही केवळ अशक्य गोष्ट आहे. काहीजण आपली एपिलेप्सीची व्याधी लपवून लग्न जमवतात, त्यांची लग्ने फसवणूक ह्या कारणास्तव मोडतात. त्यामुळे संस्थेतर्फे २००८ पासून एपिलेप्सी वधूवर मंडळ सुरू करण्यात आले. हे बहुदा भारतातील या विषयाला वाहून घेतलेले एकमेव वधूवर मंडळ आहे. आजवर संस्थेने २८ लग्ने जमवली असून, पुण्यात संस्थेने पाच ‘एपिलेप्सी वधूवर मेळावे’ घेतले आहेत. संवेदना फाउंडेशन एपिलेप्सी विवाह मंडळाच्या शाखा आता नागपूर व डोंबिवली येथेही सुरू होत आहेत. या उपक्रमातील पुढचा भाग म्हणूनच, रविवारी, २० जानेवारी २०१९ रोजी एपिलेप्सीसहीत जगणाऱ्या लग्नाळू वयाच्या मुलामुलींसाठी एक कार्यशाळा आयोजित केली आहे. या कार्यशाळेत वधूवरांसाठी मेंदूतज्ञ, मानसोपचार तज्ञ व विवाह समूपदेशक मार्गदर्शन करणार आहेत. सकाळी नऊ ते दहा या वेळेत नावनोंदणी झाल्यावर, दहा वाजल्यापासून कार्यक्रम सुरू होईल. एपिलेप्सीचा इतिहास असणाऱ्या वधूवरांनी आणि पालकांनी या कार्यशाळेला जरूर उपस्थित राहावे.’

नावनोंदणीसाठी संपर्क :
९८५०८ ८७६४४, ९८२२० ०८०३५ 

कार्यक्रमाविषयी 
संवेदना फाउंडेशनतर्फे एपिलेप्सीग्रस्त वधूवरांसाठी मार्गदर्शन 
स्थळ : निवारा वृद्धाश्रमाचे सभागृह, नवी पेठ. 
दिवस व वेळ : रविवारी, २० जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Rashmi Joshi About 31 Days ago
Good work from Team Sanvedana. All the best. Looking forward to joining you all soon.
0
0

Select Language
Share Link