Next
‘धोरणात्मक नियोजनात अर्थतज्ञाची भूमिका महत्त्वाची’
प्रेस रिलीज
Friday, August 10 | 05:20 PM
15 0 0
Share this story



मुंबई : ‘लोकांचा दृष्टीकोन आणि विचारांना आकार देण्यात आणि कॉर्पोरेट क्षेत्र, केंद्रीय बँका, सरकारे आणि बहुविध संस्थांच्या धोरणात्मक नियोजनाची रचना करण्यात अर्थतज्ञाची भूमिका महत्त्वाची असते,’ असे मत भारतीय रिसर्व्ह बँकेचे चे गव्हर्नर डॉ. उर्जित पटेल यांनी व्यक्त केले.

अर्थशास्त्रामधील पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी आघाडीवर असलेल्या संस्थापैकी एक मेघनाद देसाई अॅकॅडमी ऑफ इकॉनॉमिक्सचा (एमडीएई) पदवीदान समारंभ नुकताच आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ‘अर्थतज्ञाची भूमिका आणि महत्त्व’ या विषयावर ते बोलत होते.

डॉ. पटेल म्हणाले, ‘धोरणांचे निर्धारण करण्यामध्ये अर्थतज्ञांचे योगदान हे अप्रत्यक्षरित्या असते. अर्थतज्ञांद्वारे करण्यात येणाऱ्या विविध संशोधनामुळे धोरणांचे रचनाकार आर्थिक समस्या, आव्हानांविषयी नवीन-वेगळ्या पद्धतीने विचार करण्यास प्रेरित होतात.’

पटेल यांनी भारत सरकारच्या वस्तू व सेवा कर, दिवाळखोरी आणि दिवाळखोरी संहिता व चलनविषयक धोरण सुधारणांची प्रशंसा करताना या निर्णयांचा चांगला परिणाम आपल्याला येणाऱ्या दशकात अनुभवता येईल, असा विश्वास व्यक्त केला. या वेळी त्यांनी ‘एमडीएई’चे अध्यक्ष लॉर्ड मेघनाद देसाई यांच्या उपस्थितीत ‘एमडीएई’च्या २०१७-१८ बॅचच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले.

प्रख्यात अर्थतज्ज्ञ आणि ‘एमडीएई’चे अध्यक्ष देसाई म्हणाले, ‘देशामध्ये आमूलाग्र बदल घडवण्यासाठी उत्सुक असणाऱ्या अर्थतज्ञांच्या या नवीन पिढीचा गौरव करण्यासाठी आणि त्यांच्यासमोर आपले विचार प्रकट करण्यासाठी ‘आरबीआय’चे गव्हर्नर डॉ. उर्जित पटेल यांसारख्या थोर विभूतीची उपस्थिती लाभली याचा आम्हाला अतिशय आनंद आहे. अर्थतज्ञांसाठी डॉ. पटेल यांचे भाषण आणि सहकार्याबद्दल आम्ही आभार व्यक्त करतो. अर्थव्यवस्थेमध्ये बदल घडवण्यास अनुकूल असलेल्या या काळात असे मार्गदर्शन खूपच आवश्यक आहे.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link