Next
‘डीकेटीई’च्या विद्यार्थ्यांनी बनविली स्मार्ट बस सिस्टीम प्रणाली
प्रेस रिलीज
Thursday, April 25, 2019 | 04:40 PM
15 0 0
Share this article:

आधुनिक स्मार्ट बस सिस्टीम  प्रकल्प सादर करणारे विद्यार्थी आणि मार्गदर्शक प्राध्यापक.

इचलकरंजी : येथील ‘डीकेटीई’च्या अंतिम वर्ष इलेक्ट्रॉनिक्स विभागामधील प्रणव कवठेकर, तन्मय जोशी, पूजा पाटील व रोहिणी चव्हाण या विद्यार्थ्यांनी परदेशात कार्यरत असणाऱ्या आधुनिक बसचा संदर्भ घेऊन ‘डीकेटीई’मध्ये स्मार्ट बस सिस्टीम हा प्रकल्प बनवला आहे. 

‘डीकेटीई’च्या विद्यार्थ्यानी नेहमी समाजोपयोगी संशोधन प्रकल्प उभे केले आहेत. हा प्रकल्पही त्यापैकीच एक असून, या प्रकल्पामुळे बसचे कोलमडलेले वेळापत्रक, बसमध्ये होणारी गर्दी, चालत्या बसमध्ये तिकीट काढताना येणाऱ्या अडचणी, अचानक बस रद्द होणे, दिवसेंदिवस वाढते अपघाताचे प्रमाण या शिवाय अपघात झाला, तर त्या ठिकाणी तत्पर मदत कार्य कसे करता येईल या बाबींचा विचार करून प्रवाशांचा बस प्रवास अधिक सुखकर होण्यासाठी हा प्रकल्प उपयुक्त आहे. या विद्यार्थ्यांना प्रा. व्ही. बी. कुंभार यांचे मार्गदर्शन लाभले. या प्रकल्पामुळे बससंदर्भातील अनेक त्रुटी कमी होण्यास मदत होणार आहे.

या प्रकल्पामध्ये बसचे लाइव्ह लोकेशन दर्शवणारे, तसेच पुढील बस स्थानकाबाबत पूर्वसूचना देणाऱ्या सुविधा पुरविण्यात येणार आहेत. बसमधील एकूण प्रवाशांची संख्या, एकूण बसथांबे, लागणारा वेळ या सर्व गोष्टींची माहिती प्रवाशांना मोबाइल अ‍ॅपद्वारे मिळण्यास मदत होईल. तिकीट काढण्यासाठी होणारा त्रास पाहता प्रत्येक प्रवाशांना ‘आरएफआइडी’ पासची सुविधा पुरविण्यात आली आहे. यामुळे विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांनादेखील चाप बसणार आहे. या सर्व सोईमुळे बसचा प्रवास आणखी सुखकर होण्यास मदत होणार आहे. 

हा प्रकल्प राष्ट्रीय स्तरावरील झालेल्या प्रकल्प सादरीकरणाच्या विविध स्पर्धांमध्ये सादर केला असून, या प्रकल्पाला अनेक ठिकाणी पारितोषिके देऊन गौरविण्यात आले आहे. या प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी संस्थेचे संचालक प्रा. डॉ. पी. व्ही. कडोले, उपसंचालक प्रा. डॉ. यू. जे. पाटील, उपसंचालिका व विभागप्रमुख प्रा. डॉ. एल. एस. आडमुठे व विभागातील सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 87 Days ago
Will it be marketable ? It might be safe to take out a patent . There are specialists who know about ths -- it is legal safety .
0
0

Select Language
Share Link
 
Search