Next
‘अरविंद सावंतांमुळे मुंबईला मिळाले सशक्त प्रतिनिधित्व’
आमदार मंगल प्रभात लोढा यांचे प्रतिपादन
प्रेस रिलीज
Saturday, June 01, 2019 | 05:43 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांची केंद्र सरकारमधील मंत्रिमंडळातील मंत्रिपदी निवड झाल्यामुळे भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष आणि मलबार हिलचे आमदार मंगल प्रभात लोढा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आभार व्यक्त केले. 

या वेळी बोलताना लोढा म्हणाले, ‘सावंत यांना केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्रिपद मिळाल्याने दक्षिण मुंबईला आणखी एक सशक्त प्रतिनिधित्व लाभले आहे. सावंत यांना दक्षिण मुंबईतील समस्यांबाबत माहिती आहे. त्यामुळे आता येथील अनेक समस्या सोडविण्यासाठी केंद्राकडून अधिक सहकार्य मिळेल. मंत्री झाल्यानंतर केंद्राकडून मिळणाऱ्या मदतीत सावंत यांचा महत्त्वाचा वाटा असेल व समस्या निराकरणाचे काम लवकर सुरू होईल व तितक्याच लवकर पूर्ण होईल. खासदार अरविंद सावंत मंत्री झाल्याने विकासासाठी अडथळा आणणारे अनेक प्रस्ताव मार्गी लागतील.’

नवी दिल्लीमध्ये राष्ट्रपती भवनात झालेल्या शपथविधी सोहळ्यात आमदार मंगल प्रभात लोढा हेदेखील उपस्थित होते. शपथविधी सोहळ्यानंतर सावंत यांच्या घरी भेटून त्यांनी शुभेच्छा दिल्या. 

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात मलबार हिल भागातील सावंत यांना सुमारे ६० हजारांनी मताधिक्य मिळाले आहे. त्यांच्या विजयासाठी मलबार हिल येथील मतदानाचा टक्का महत्त्वपूर्ण ठऱला आहे. सावंत एक लढाऊ नेता आहेत व ते जनतेच्या समस्या समजून घेतात. त्यामुळे लोकांना त्यांच्याकडून खूप अपेक्षा असल्याचे लोढा यांनी सांगितले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search