Next
दिव्यांग खेळाडू, सामाजिक कार्यकर्त्यांचा गौरव
‘म्हाळू पार्वती प्रतिष्ठान’च्या वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रम
BOI
Friday, March 29, 2019 | 11:18 AM
15 0 0
Share this article:

पुणे : ‘म्हाळू पार्वती प्रतिष्ठान’च्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पुण्यातील दिव्यांग खेळाडू, दिव्यांगांचे प्रशिक्षक आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या उपस्थितीत चार एप्रिल रोजी औंध येथील पंडित भीमसेन जोशी कलादालनात संध्याकाळी चार वाजता हा कार्यक्रम होणार आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश निकम यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. 

या कार्यक्रमाला माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार, अभिनेते प्रसाद सुर्वे, समाज कल्याण विभागाचे आयुक्त मिलिंद शंभरकर, अपंग कल्याण विभागाचे उपायुक्त नितीन ढग, भूमी अभिलेख विभागाचे जिल्हा अधिक्षक राजेंद्र गोळे आणि दत्ता साने उपस्थित राहणार आहेत. 

या कार्यक्रमात पुणे जिल्ह्यातील दिव्यांगांसाठीच्या शाळांना बॅटरीवरील ध्वनिक्षेपण यंत्रणा, मोबाईल संच, ट्रॅक सूट, बॅग, प्रथमोपचार पेटी असा संच भेट दिला जाणार आहे.

कार्यक्रमाच्या नियोजनासाठी नुकतीच प्रतिष्ठानची बैठक झाली. त्या वेळी निलेश निकम, प्रकाश निकम, पूनम हेंद्रे, डॉ. संजय जोशी, विलास निकम, बबन निकम, शैलेश हेंद्रे उपस्थित होते. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search