Next
‘फोर्ड’तर्फे ‘फोर्ड फ्रीस्टाइल’चे अनावरण
प्रेस रिलीज
Thursday, February 01 | 04:15 PM
15 0 0
Share this story

पुणे : फोर्ड इंडियातर्फे नव्याकोर्‍या ‘फोर्ड फ्रीस्टाइल’ या आधुनिक जागतिक उत्पादनाचे अनावरण करण्यात आले केले असून, हे भारतीय ग्राहकांसाठी निर्माण केलेले सक्षम असे कॉम्पॅक्ट युटिलीटी वाहन आहे.

‘फोर्ड’च्या या नव्याकोर्‍या उत्पादनात एसयूव्हीसारखे आधुनिक डिझाईन, अद्वितीय परफॉर्मन्स, कल्पक तंत्रज्ञान आणि उत्कृष्ट इंधनक्षमता यांचा मिलाफ साधला गेला असून, भारतीय ग्राहक तसेच जगभरातील बाजारपेठांसाठी हा एक उत्तम पर्याय तयार झाला आहे. फ्रीस्टाइलच्या जागतिक विक्रीला प्रथम भारतातच सुरुवात होणार असून, ग्राहकांसाठी २०१८च्या दुसर्‍या तिमाहीत ही गाडी बाजारात दाखल होणार आहे.

‘फोर्ड’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अनुराग मेहरोत्रा म्हणाले, ‘फोर्ड फ्रीस्टाईलचे जागतिक अनावरण प्रथम भारतात करण्यात येत असल्यामुळे यातून ‘फोर्ड’ची भारताप्रति असलेली बांधिलकी स्पष्ट होते. भारतीय ग्राहकांना हवे असलेले मौल्यवान उत्पादन आम्ही या माध्यमातून त्यांना देत आहोत. कूल, सक्षम आणि कनेक्टेड फोर्ड फ्रीस्टाइलच्या माध्यमातून, भारतातील फोर्ड ग्राहकांच्या कुटुंबात भर घालण्यासाठी आमच्या वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओमध्येही आम्ही मौल्यवान भर घालत आहोत.’

‘ग्राहकांची एसयूव्हीसारख्या वाहनांची गरज व मागणी पूर्ण करण्याच्या दृष्टीने, नवीन फ्रीस्टाइल या गाडीमुळे फोर्डची प्रतिमा अधिक उंचावणार आहे. अशा प्रकारची वाहने त्यांच्या अद्वितीय आसन व्यवस्थेसाठी तसेच शहरी भागातील गर्दी आणि इतर बाबी लक्षात घेऊन उत्तम ग्राऊंड क्लिअरन्ससाठी विकत घेतली जातात. कॉम्पॅक्ट एसयूव्हींच्या सेगमेंटमध्ये ‘फोर्ड’ने इकोस्पोर्ट्स या मॉडेलच्या माध्यमातून प्रवेश केला असून, यामुळे भारतातील सरासरी ऑटोमोटिव्ह विक्रीमध्ये सातत्याने वाढ होत गेली,’ असे त्यांनी सांगितले.

२०१३ ते २०१६ या तीन वर्षांच्या कालावधीत या विक्रीत तिप्पट वाढ झाली. २०१७ या एका वर्षांत भारतातील एसयूव्हींची विक्री ३७ टक्क्यांनी वाढली, तर एकूण वाहनविक्रीत केवळ नऊ टक्क्यांचीच वाढ नोंदवण्यात आली.

‘फोर्ड’चे विश्वसनीय १.५ लीटर डिझेल इंजिनही १०० पीएस पॉवर आणि २१५ एनएम टॉर्क निर्माण करत असून, या गाडीत ग्राहकांना पेट्रोल व डिझेल या दोन्ही प्रकारच्या इंजिनांचे पर्याय उपलब्ध आहेत. सर्व वातावरणात फ्रीस्टाईलकडून खिलाडू ड्रायव्हिंग परफॉर्मन्स दिला जात असून यात वाढीव ट्रॅक रुंदीसह विशिष्ट पद्धतीने ट्यून्ड सस्पेन्शन, उच्च ग्राऊण्ड क्लिअरन्स, टीसीएस, ईबीडीसह एबीएस आणि विशिष्टरित्या ट्यून्ड ईपीएएस बसवण्यात आले आहेत.

‘फोर्ड’चे वैशिष्ट्य असलेली सर्व सुरक्षा उपकरणे फ्रीस्टाइलमध्ये देण्यात आली असून, यात सहा एअरबॅग्स आहेत. अ‍ॅक्टिव्ह रोलओव्हर प्रिव्हेन्शन (एआरपी)च्या माध्यमातून, कोणत्याही वाईट परिस्थितीतही अधिक चांगल्याप्रकारे कामगिरी करण्यासाठी फ्रीस्टाइल डिझाइन करण्यात आली आहे. यामुळे, ब्रँडचा फन-टू-ड्राईव्ह दृष्टिकोन कायम राहतो. यामध्ये सिंक तीन ही इन-कार इन्फोटेन्मेंट सिस्टीम बसवण्यात आली असून, याला ६.५ इंची टचस्क्रीन देण्यात आली आहे. यामुळे चालकाचा मनोरंजनात्मक उपकरणांवर ताबा रहात असून, संवादात्मक ध्वनी संदेशासह आपल्या स्मार्टफोनशीही कनेक्टेड राहता येते. सिंक तीन सिस्टीम अ‍ॅप्पल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो कम्पॅटिबल ओएसना सहाय्यभूत आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link