Next
डोंबिवलीत रंगले ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले कविसंमेलन
मिलिंद जाधव
Monday, January 07 | 02:55 PM
15 0 0
Share this story



डोंबिवली : कल्याण येथील लाखमोलाच्या कविता काव्यमंच, भिवंडीतील माझी आई प्रतिष्ठान, बहुद्देश मानवसेवा संस्था, मुंबईतील विकास प्रबोधिनी संस्था, कल्याणमधील रामवेणू काव्यमंच दिवा, कवीकट्टा आणि ठाणे येथील चैतन्य सुखदेव सोनावणे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १८८ व्या जयंतीनिमित्त ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई काव्यफुले २०१९’ या कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.

मुलींसाठी शिक्षणाची कवाडे उघडणाऱ्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची माहिती सर्वांना माहिती व्हावी या हेतूने आयोजित केलेले हे संमेलन डोंबिवलीतील जोंधळे हायस्कूल येथे झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कवियत्री मनिषा मेश्राम होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून कवियत्री सुरेखा गायकवाड, पत्रकार नीलम चौधरी, पत्रकार अमृता आनप उपस्थित होत्या. महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला वंदन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.

या वेळी बोलताना पत्रकार अनप म्हणाल्या, ‘आजही समाजाला मुलगा हाच वंशाचा दिवा हवा आहे. हा बदल आता झाला पाहिजे. सावित्रीबाई फुले होत्या म्हणून मी आज पत्रकार आहे. अन्याय होऊ देऊ नका आणि अन्याय सहन करू नका. उलट त्या परिस्थिवर मात करा. कोणतीही महिला अथवा लहान मुलगीवर अन्याय होत असेल, तर नक्कीच तिला मदत करा, तेव्हाच खऱ्या अर्थाने उद्याची सावित्री जन्माला येईल. आपल्या सर्वांना शिक्षण मिळावे म्हणून सावित्रीबाईंनी किती मोठा त्याग सहन केला याची जाणीव सर्व महिलांना असली पाहिजे. त्यांचे कार्य नेहमीच आपल्या डोळ्यासमोर ठेऊन काम करा. नक्कीच घराघरात सावित्रीबाई आपल्याला दिसेल.’



मेश्राम म्हणाल्या, ‘या विचारमंचावरून प्रथमच काही महिलांनी आपले विचार मांडायला संधी मिळाली आहे. सावित्रीबाईंच्या आठवणींनी आम्ही कवितेच्या माध्यमातून उजाळा देण्याचे काम आम्ही हाती घेतले असून, विविध  उपक्रमांतून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही राबविणार आहोत.’

या वेळी विविध ठिकाणांहून आलेल्या कवियत्री व कवींनी स्वरचित कविता, गाणी सादर केली. या संमेलनात ५० कवी सहभागी झाले होते. त्यांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. जेष्ठ कवी गायक किरण सोनावणे, जेष्ठ कवी गायक मास्टर राजरत्न राजगुरू, साहित्यिक अॅड. श्रीकृष्ण टोबरे, साहित्यिक विजयकुमार भोईर, साहित्यिक जगदेव भटू, अॅड. प्रज्ञेश सोनावणे, पत्रकार संतोष सावंत, कवी नवनाथ रणखांबे, कवी दीप, कवी संघरत्न घनघाव, कवी मारुती कांबळे, कवी शाम भालेराव, कवियत्री ज्योती गोळे, कवियत्री सुनंदा कांबळे, प्रतीक्षा थोरात, गौतम वानखडे आदी उपस्थित होते. आशा रणखांबे यांनी प्रस्ताविक केले. कवी मिलिंद जाधव यांनी सूत्रसंचालन केले. कवी नवनाथ रणखांबे यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link