Next
पुणे विद्यार्थी गृहात ‘टेकक्राफ्ट’ महोत्सव
प्रेस रिलीज
Saturday, September 15 | 11:34 AM
15 0 0
Share this story

पुणे : पुणे विद्यार्थी गृहाच्या व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंग स्टुडंट असोसिएशनतर्फे (टेसा) ‘टेकक्राफ्ट’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

तांत्रिक गोष्टींवर आधारलेल्या या महोत्सवात एकूण १८ स्पर्धा घेण्यात आल्या. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, एमआयटी, व्हीआयटी, कमिन्स महाविद्यालय, एआयएसएसएमएस, व्हीव्हीआयटी यांसह इतर महाविद्यालयातील एक हजार ५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला. मुलाखतीसाठी मॉक प्लेसमेंट, फोटोग्राफीसाठी शटर-अप, व्हिडिओनामा, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्ससाठी डिजिट्रीक्स, तांत्रिक शब्दांच्या मूकाभिनयासाठी टेकअॅक्ट, ट्रेझर हंट, संशोधनासाठी टेकटेड, गुगलर, टाइपफेस्ट, मार्केटाइजमेंट, टेक्नो स्केच, रोबो, सी-बग्ज, पीसीबी वॉर्स, ब्रेनोव्हा, काउंट्रॅक्ट अशा विविध स्पर्धांचा यात समावेश होता.

गेल्या २४ वर्षांपासून कार्यरत असलेल्या ‘टेसा’ या विद्यार्थ्यांच्या असोसिएशनतर्फे वृक्षारोपण, वृद्धसेवा, निर्माल्य संकलन असे अनेक समाजोपयोगी उपक्रमही राबविले जातात. केरळमधील पूरग्रस्तांसाठी ‘टेसा’तर्फे कपडे पुरवण्यात आले. शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांना रोपवाटप करण्यात आले. या महोत्सवातून विद्यार्थ्यांतील कलागुणांना वाव मिळण्यासाठी या महोत्सव उपयुक्त ठरतो.

‘महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन शाखेतील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या महोत्सवासाठी मेहनत घेतली,’ असे महाविद्यालयाचे कुलसचिव सुनील रेडेकर यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link