Next
डेव्हिल्स अ‍ॅडव्होकेट
BOI
Monday, June 10, 2019 | 10:33 AM
15 0 0
Share this article:

तीन मुलींनंतर मुलगा जन्माला आल्याने थापर कुटुंबात आनंद होता. मुलाचे नामकरण ‘करण’ असे झाले. महाविद्यालयीन शिक्षण ब्रिटनमध्ये घेत असताना त्यांची पावले अचानकपणे पत्रकारितेकडे वळली. लंडनमधील ‘दी टाइम्स’ या वर्तमानपत्रासाठी परराष्ट्रातील प्रतिनिधी म्हणून त्यांनी काम करण्यास सुरुवात केली. तेथे त्यांचे वरिष्ठ चार्ल्स डग्लस होम यांनी त्यांना बातमी कशी लिहावी याचे शिक्षण दिले. १९८०पासून आतापर्यंत त्यांच्या पत्रकारितेचा आणि आयुष्याचा रंजक रिपोर्ताज ‘डेव्हिल्स अ‍ॅडव्होकेट’ म्हणून वाचायला मिळतो. 

ब्रिटनमधील शिक्षण, त्या दरम्यान पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनजीर भुट्टो, म्यानमारच्या लोकशाहीवादी नेत्या आँग सान स्यू की, राजीव गांधी मैत्री व त्यांच्या मुलाखती, निशाबरोबरचे वैवाहिक जीवन आदी आठवणी यात आहेत. नरेंद्र मोदी मुलाखतीतून निघून का गेले, हे त्यांनी यथे सांगितले आहे. प्रणव मुखर्जी, लालकृष्ण अडवाणी जयललिता, राम जेठमलानी, कपिल देव यांच्या मुलाखतींबद्दल त्यांनी खुलेपणाने लिहिले आहे. याचा मराठी अनुवाद सचिन जहागीरदार यांनी केला आहे. 

पुस्तक : डेव्हिल्स अ‍ॅडव्होकेट
लेखक : करण थापर
अनुवादक : सचिन जहागीरदार
प्रकाशक : मंजुल पब्लिशिंग हाउस
पाने : २३८ 
किंमत : ३५० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search