Next
स्वच्छता पंधरवड्यानिमित्त रत्नागिरी शहरात स्वच्छता रॅली
BOI
Friday, July 19, 2019 | 01:45 PM
15 0 0
Share this article:

रत्नागिरी शहरातून काढण्यात आलेली स्वच्छता रॅली. (सर्व छायाचित्रे : कांचन मालगुंडकर))

रत्नागिरी : केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत स्वस्थ भारत या मोहिमेंतर्गत एक ते १५ जुलै या कालावधीत स्वच्छता पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले होते. याचे औचित्य साधून अद्वैत पेट्रोलियम, आर. बी. शिर्के अँड सन्स, रत्नागिरी पोलीस आणि हॉटेल सी फॅन्स यांच्या वतीने रत्नागिरी शहरात नुकतीच स्वच्छता रॅली काढण्यात आली. 

‘जीजीपीएस’मधील विद्यार्थ्यांना स्वच्छतेची प्रतिज्ञा देताना मान्यवर

या निमित्ताने विद्यार्थ्यांना स्वच्छता प्रतिज्ञा, पेट्रोल पंपातील कर्मचारी स्वच्छता शपथ सोहळा, वृक्षलागवड, समुद्रकिनारा स्वच्छता असे विविध उपक्रम राबविण्यात आले. प्रारंभी श्रीमान गंगाधर गोविंद पटवर्धन इंग्लिश मीडियम शाळेतील (जीजीपीएस) विद्यार्थ्यांना स्वच्छतेची प्रतिज्ञा देण्यात आली. या वेळी अद्वैत पेट्रोलपंपाचे अॅड. कॅप्टन कोमल सिंग, भारत पेट्रोलियमचे एरिया सेल्स मॅनेजर धाया हंबीर, अद्वैत मोटर्सचे व्यवस्थापक अर्जुन सिंग, महेंद्र सिंग, अद्वैत पेट्रोलियमचे व्यवस्थापक संजीव फोडकर प्रा. सौ. साळवी, सोनाली पाटणकर उपस्थित होते. शिक्षक महेश मुळ्ये आणि पाटणकर यांनी प्रस्तावना केली. या प्रसंगी कॅप्टन कोमल सिंग यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व सांगून त्या संदर्भात मार्गदर्शन केले.

रत्नागिरी पोलीस कर्मचारी आणि अद्वैत पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना स्वच्छतेची प्रतिज्ञा देताना मान्यवर

त्यानंतर प्रमुख पाहुणे कौस्तुभ सावंत आणि रत्नागिरी पोलीस ठाण्याचे आरपीआय श्री. पालशेतकर यांच्या उपस्थितीत शहरातील माळनाका येथील अद्वैत पेट्रोल पंपातील सर्व कर्मचारी, तसेच पोलीस कर्मचार्यांना स्वच्छतेची प्रतिज्ञा देऊन त्याखाली सर्वांची स्वाक्षरी घेण्यात आली. यानंतर मान्यवरांनी स्वच्छता रॅलीला झेंडा दाखविला. अद्वैत पेट्रोल पंप येथून सुरू झालेली ही रॅली जिल्हाधिकारी कार्यलय, शहर बसस्थानक येथून वळून आर. बी. शिर्के अँड सन्स येथे समाप्त करण्यात आली. त्यानंतर अद्वैत पेट्रोलियम, आर. बी. शिर्के पेट्रोल पंप, हॉटेल सी फॅन्स आणि रत्नागिरी पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने मांडवी समुद्र किनाऱ्याचा परिसर स्वच्छ करण्यात आला. यानंतर शहर पोलीस परेड मैदानावर वृक्षारोपणा करण्यात आले. 

मांडवी समुद्र किनाऱ्याची स्वच्छता

पोलीस कवायत मैदानावर वृक्षारोपण
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search