Next
‘निसर्गाचा अनमोल ठेवा म्हणजे पाणी’
रंगत संगत प्रतिष्ठानच्या पाणी कवीसंमेलनात डॉ. मोरे यांचे प्रतिपादन
प्रेस रिलीज
Tuesday, May 21, 2019 | 04:43 PM
15 0 0
Share this article:

कार्यक्रमाप्रसंगी डावीकडून प्रभा सोनवणे, प्रमोद आडकर, धर्मचंद फुलफगर, डॉ. सदानंद मोरे, मैथिली आडकर आणि शिल्पा देशपांडे.

पुणे : ‘साहित्यामध्ये, काव्यामध्ये पाणी हा अविभाज्य घटक आहे; तसेच मानवी जीवनात भौतिक मालमत्तेपेक्षाही पाणी महत्त्वाचे आहे. म्हणूनच त्याचे संरक्षण, संवर्धन करणे आपले कर्तव्य आहे,’ असा सल्ला महाराष्ट्र राज्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी दिला.

रंगत संगत प्रतिष्ठानतर्फे पाणी कवीसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी प्रमोद आडकर, मैथिली आडकर, प्रभा सोनवणे, धर्मचंद फुलफगर, शिल्पा देशपांडे उपस्थित होते. खेडेगावात मोफत टँकर वाटप करणारे फुलफगर यांचा या कार्यक्रमादरम्यान सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना हा दातृत्वाचा वारसा आईकडून मिळाला असल्याचे नमूद करत प्रत्येकाने एक टँकरची जबाबदारी घेतली, तर दुष्काळग्रस्तांना दिलासा मिळेल, अशी भावना त्यांनी या प्रसंगी व्यक्त केली.

त्यानंतर झालेल्या कवीसंमेलनामध्ये पाणीविषयक विविध कविता सादर झाल्या. ज्यात दुष्काळी भागातील वेदना, परिस्थिती शब्दांतून व्यक्त झाली. ‘माझ्या मायेला डोक्यावरून हंडा घेऊन येताना पहिले, तेंव्हा वाटले पाण्याशिवाय जगात आले असते, तर किती बरे झाले असते’ या सुजित कदम यांनी दुष्काळी भागातील ‘माय’ कवितेवून चितारली. सुप्रिया जाधव यांनी मनातील डोह शब्दात उतरविला, तर ‘आजकाल पाणी पाण्यासारखे वागत नाही’ या कवितेनीही रसिकांचे डोळे पाणावले. अंजली कुलकर्णी यांच्या ‘पाणी असतेच कुठे तरी प्रत्येकाच्या काळजात...’ या कवितेने रसिकांच्या मनात ओलावा निर्माण केला. 

यानंतर दीपक करंदीकर, मनोहर सोनवणे, आश्लेषा महाजन, मृणालिनी कानिटकर-जोशी, वंदना जोशी, सुजाता पवार, चिन्मयी चिटणीस, मीना शिंदे, उज्ज्वला सहाणे, तेजस्विनी शिरोडकर, धनंजय तडवलकर, आरुषी दाते आणि विजय सातपुते यांनी पाण्यावर भाष्य करणाऱ्या कविता सादर केल्या. प्रमोद आडकर यांनी प्रास्तविक केले. शिल्पा देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search