Next
‘गोरगरिबांना आधार देण्याची गोपीनाथ मुंडेंची शिकवण’
धीरज घाटे यांचे प्रतिपादन
BOI
Friday, December 14, 2018 | 04:31 PM
15 0 0
Share this article:

गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त पुणे विद्यार्थीगृह येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात भारतीय जनता पक्षाचे प्रदेश चिटणीस नगरसेवक धीरज घाटे यांच्यासह मिलिंद वेर्लेकर, सुभाष जिर्गे, राजेंद्र कांबळे व अन्य मान्यवर.

पुणे : ‘स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी कष्टकरी, ऊसतोड कामगार आणि वंचित घटकांतील लोकांना सन्मान दिला. छोट्यातल्या छोट्या कार्यकर्त्याला घडविण्याचे काम त्यांनी केले. त्यांच्याकडे पाहूनच माझा राजकीय प्रवास सुरू झाला. त्यांनी दिलेल्या संस्कारांमुळे माझी जडणघडण झाली’, अशी भावना भारतीय जनता पक्षाचे प्रदेश चिटणीस नगरसेवक धीरज घाटे यांनी व्यक्त केली. 

गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त साने गुरुजी तरुण मंडळ, भारतीय जनता पार्टी आणि हिंदूगर्जना प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी पुणे विद्यार्थीगृह येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात घाटे बोलत होते. या वेळी धीरज घाटे यांनी पुणे विद्यार्थीगृहामधील वीस विद्यार्थ्यांची शैक्षणिक जबाबदारी घेत, त्यांच्या पुढील शिक्षणासाठी एक लाख रुपयांचा निधी प्रदान केला. 

यामध्ये लातूर, उस्मानाबाद, बीड, परभणी येथील गरीब आणि गरजू, ऊसतोडणी कामगारांची आणि अनाथ मुले आहेत. या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, जीवनोपयोगी वस्तू आणि थंडीपासून बचाव करण्यासाठीचे साहित्य वितरित करण्यात आले. या वेळी घाटे यांनी ११ हजार, तर आनंद पाटील आणि भूषण पासलकर यांनी १० हजारांची देणगी पुणे विद्यार्थीगृहाला दिली.

या कार्यक्रमाला मिलिंद वेर्लेकर, पुणे विद्यार्थीगृहाचे कार्याध्यक्ष सुभाष जिर्गे, कार्यवाह राजेंद्र कांबळे, कुलसचिव सुनील रेडेकर, संचालक कृष्णाजी कुलकर्णी, रमेश कुलकर्णी, नगरसेवक रघुनाथ गौडा, नगरसेविका स्मिता वस्ते, सरस्वतीताई शेंडगे, माजी नगरसेविका मनिषा घाटे, राजाभाऊ शेंडगे, आशिष चांदोरकर, राजेंद्र फाटे, ओंकार कुलकर्णी, अमर आवळे यांच्यासह भाजपाचे अनेक पदाधिकारी आणि साने गुरुजी तरुण मंडळाचे कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मिलिंद वेर्लेकर, राजेंद्र कांबळे, रघुनाथ गौडा यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्रा. सचिन जायभाये यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन विजय गायकवाड यांनी केले. मनीषा घाटे यांनी आभार मानले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search