Next
‘वारी’ हा माहितीपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
प्रेस रिलीज
Monday, July 15, 2019 | 05:46 PM
15 0 0
Share this article:

डावीकडून प्रेम सावंत, धनेश कुलकर्णी, राजवीर पाटील आणि विवेक करळे.

पुणे : ‘वारी’ या आषाढी वारीवरील माहितीपटाचे चित्रीकरण आषाढी एकादशीच्या दिवशी पुण्यात करण्यात आले. या माहितीपटात वारीचे अंतरंग दाखवण्यात आले आहेत. इंद्रायणीच्या तीरावरून माऊलीसोबत विठ्ठल भेटीला निघालेला वैष्णवांचा मेळा चंद्रभागेचे वाळवंट तुडवून विठ्ठल चरणी लीन होईपर्यंतचा सगळा प्रवास यात अतिशय रंजक पद्धतीने दाखवला आहे. 

या माहितीपटाला वेगळे स्वरूप देण्यासाठी या वारीत स्वतः विठ्ठल भूतलावर अवतरतात ही कल्पना मांडून ही वारी विठ्ठलाच्या नजरेतून प्रेक्षकांना दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. वारीतील आणि पुणे शहरातील प्रत्येक गोष्ट विठ्ठल आपल्या नजरेने पाहतो आणि त्यावर आपले मत व्यक्त करतो, अशी या माहितीपटाची संकल्पना असल्याचे निर्माते धनेश कुलकर्णी आणि प्रेम सावंत यांनी सांगितले.

या माहितीपटाची निर्मिती फोरके फिल्म्सतर्फे करण्यात आली असून, अर्थसाह्य पल्लवी कुलकर्णी, पुष्पलता चव्हाण यांचे आहे. माहितीपटाचे लेखन, दिग्दर्शन प्रेम सावंत यांचे आहे. विवेक करळे कार्यकारी निर्माते आहेत. मनीषा राहणे यांनी रंगभूषेची जबाबदारी पार पाडली असून, युवा कलाकार राजवीर पाटील यांनी विठ्ठलाची भूमिका केली आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search