Next
पेटीएमची ‘गोल्ड सेव्हिंग्ज’ सेवा
प्रेस रिलीज
Friday, March 16, 2018 | 03:53 PM
15 0 0
Share this story

मुंबई : भारताचा सर्वात मोठा मोबाइल-फर्स्ट आर्थिक सेवा मंच ‘पेटीएम’ने आपल्या संपत्ती व्यवस्थापनाचा एक भाग पेटीएम गोल्डद्वारे  ग्राहकांसाठी गोल्ड गिफ्टिंग आणि गोल्ड सेव्हिंग्ज प्लॅन या दोन नवीन सेवा सुरु करीत असल्याची घोषणा केली आहे. 

गोल्ड गिफ्टिंग सुविधेसह ग्राहकांना सोयीस्कर गिफ्टिंग पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे ज्याद्वारे ते २४ कॅरेट ९९९.९ शुद्ध सोने एकमेकांना सहज पाठवू शकतात. गोल्ड सेव्हिंग्ज योजना ग्राहकांना आपल्या बजेट आणि गरजेनुसार सोन्यामध्ये छोट्या छोट्या गुंतवणूकीद्वारे नियमितपणे सोन्यात बचत करण्यासाठी उपयुक्त ठरेल.

पेटीएमचे वरिष्ठ उपाध्यक्ष नितीन मिश्रा म्हणाले, ‘ग्राहकांना छोट्या रकमेपासून डिजिटली गोल्ड बचत करण्यासाठी प्रवृत्त करण्यामध्ये पेटीएम गोल्ड यशस्वी झाले आहे. संपत्ती व्यवस्थापनाची दोन नवीन उत्पादने दाखल करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. गोल्ड गिफ्टिंग भेटवस्तूचा नवा पर्याय ठरेल तर गोल्ड सेव्हिंग्ज दीर्घकालीन संपत्ती निर्मितीसाठी शुद्ध सोन्याचे नियमितपणे जतन करण्यासाठी एक विश्वसनीय आणि स्वस्त पर्याय प्रदान करते. येत्या वर्षात अधिकाधिक ग्राहकांपर्यंत या योजना पोहोचवून त्यांच्या बचत करण्याच्या सवयींमध्ये शिस्त आणण्यासह त्यांचे वित्तीय ध्येय गाठण्यामध्ये सहकार्य करू.’

पेटीएम गोल्ड हे एमएमटीसी-पीएएमपीकडून केव्हाही आणि कुठेही खरेदी करता येऊ शकते. केवळ १ रुपयापासून त्याची सुरुवात होत असून ते एमएमटीसी-पीएएमपीच्या मोफत आणि १००टक्के  विमाकृत, सुरक्षित लॉकरमध्ये ठेवता येते. प्रत्यक्ष लॉकरमध्ये सोने ठेवण्यासाठी द्याव्या लागणाऱ्या मोठ्या शुल्काच्या तुलनेत,पेटीएम गोल्डच्या ग्राहकांना कोणतेही अतिरिक्त शुल्क भरावे लागत नाही. ग्राहक किंमतीचे ताजे अपडेट मिळवू शकतात आणि साठवलेले सोने एमएमटीसी-पीएएमपीला त्वरित ऑनलाइन विकण्याचा पर्याय त्यांच्याकडे असतो.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link