Next
‘आजारांना दूर ठेवण्यासाठी लठ्ठपणा कमी करावा’
प्रेस रिलीज
Tuesday, November 27, 2018 | 10:48 AM
15 0 0
Share this article:



पुणे : ‘बदलती जीवनशैली, जंक फूडचे सेवन यामुळे लठ्ठपणा वाढत आहे. परिणामी, मधुमेह, रक्तदाब आणि इतर गंभीर स्वरूपाचे आजार उद्भवू शकतात. त्यामुळे अशा  आजारांना दूर ठेवण्यासाठी नियमित व्यायाम आणि पौष्टिक आहार घेऊन लठ्ठपणा कमी राहील, यासाठी आपण प्रयत्न करावेत,’ असे मत आमदार मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

जागतिक लठ्ठपणा दिनानिमित्त पुण्यातील वाइब्स या संस्थेतर्फे लठ्ठपणाबाबत जागृती करण्यासाठी २५ नोव्हेंबरला सकाळी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी उद्घाटन करताना मेधा कुलकर्णी बोलत होत्या. ‘वाइब्स’च्या पश्चिम विभागीय प्रमुख सोनिया कुमार, वैशाली दवे आदी उपस्थित होते. ‘वाइब्स’च्या कल्याणीनगर शाखेतर्फेही रॅली काढण्यात आली. या रॅलीचे उद्घाटन माजी आमदार मोहन जोशी यांच्या हस्ते करण्यात आले.

भांडारकर रस्त्यावरील ‘वाइब्स’च्या कार्यालयापासून ही रॅली निघाली. गुडलक चौक, गोखले रस्ता, फर्ग्युसन महाविद्यालय, तुकाराम पादुका चौक, जंगली महाराज रस्ता, बालगंधर्व रंगमंदिर, डेक्कन जिमखाना, गुडलक चौक ते वाइब्ज कार्यालय अशी ही रॅली झाली. ‘व्यायाम करा, लठ्ठपणा दूर ठेवा’, ‘लठ्ठपणा हटवा, निरोगी रहा’ अशा घोषणा देत जागृती करण्यात आली. संस्थेचे पदाधिकारी, कर्मचारी, सभासद या रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

या प्रसंगी बोलताना सोनिया कुमार म्हणाल्या, ‘लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिक लठ्ठपणाला बळी पडत आहेत. त्याचा आरोग्यावर विपरित परिणाम होत असून, ते थांबवण्यासाठी आपल्याला लठ्ठपणा कमी करावा लागेल.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search