Next
कोयना प्रकल्पग्रस्तांना दिलासा देणारा निर्णय
प्रेस रिलीज
Monday, February 19 | 05:42 PM
15 0 0
Share this story

मुंबई : ‘महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना धरणाच्या ज्या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन अद्याप झालेले नाही, त्यांना येत्या दोन महिन्यांत पर्यायी जमीन वाटप करण्यात यावे; तसेच ठाणे व पालघर जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांना गावठाण व पर्यायी जमीन एकाच ठिकाणी देण्यात यावी,’ असे निर्देश महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

अधिकाधिक प्रकल्पग्रस्तांना महावितरणमध्ये नोकऱ्या देण्यासंदर्भात ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमवेत बैठक आयोजित करण्याच्या सूचनाही महसूल मंत्री पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. प्रकल्पग्रस्तांना न्याय देणारे निर्णय घेतल्याबद्दल जनजागर प्रतिष्ठानचे अध्यक्ष माधव भांडारी यांनी पाटील यांचे आभार मानले आहेत.

कोयना प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांबाबत मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. जनजागर प्रतिष्ठानने कोयना प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्या शासन दरबारी मांडल्या आहेत. त्याची दखल घेऊन महसूल मंत्र्यांनी प्रकल्पग्रस्तांना दिलासा देणारे निर्णय बैठकीत जाहीर केले.

या बैठकीला महसूल उपसचिव राहुल कुलकर्णी, पालघरचे जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे, ठाणे जिल्हा पुनर्वसन अधिकारी आरती तेलंग, साताऱ्याचे अप्पर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, सातारा जिल्हा पुनर्वसन अधिकारी आरती भोसले, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता गाडे, प्रतिष्ठानचे राज्य समन्वयक माधव कुलकर्णी, सातारा जिल्हा समन्वयक देवराज देशमुख ठाणे-पालघर जिल्हा समन्वयक सेजल कदम, हरिश्चंद्र कदम, जगन्नाथ साळुंखे, नंदकुमार सुर्वे उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link