Next
‘टाटा’तर्फे भारतातील पहिला इंटेलिजंट ट्रेलर सादर
प्रेस रिलीज
Tuesday, August 07, 2018 | 10:51 AM
15 0 0
Share this article:

गांधीनगर (अहमदाबाद) : टाटा इंटरनॅशनल डीएलटीने गांधीनगरमध्ये सुरू झालेल्या ट्रक ट्रेलर आणि टायर एक्स्पोमध्ये भारतातील पहिला इंटेलिजंट ट्रेलर सादर केला. हा इंटेलिजंट ट्रेलर रस्ते अपघातांची संख्या कमी करण्यात तसेच ट्रेलर बाजारपेठेला सुधारित कार्यक्षमतेने सेवा देण्यात मदत करेल.

टाटा डीएलटीचा इंटेलिजंट ट्रेलर अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असून, ट्रेलर चालवण्याच्या तसेच देखरेखीच्या अनुकूलनासाठी आवश्यक तो डाटा हे तंत्रज्ञान ऑपरेटरला व ताफा (फ्लीट) व्यवस्थापकाला पुरवते. त्यामुळे मानवी पाठपुराव्यावरील अवलंबित्व कमी होते. टाटा इंटरनॅशनल डीएलटी हा भारतातील सर्वांत मोठा ट्रेलर उत्पादक असून, भारतातील ट्रेलर्स आणि ट्रक बॉडीजच्या सर्वांत मोठ्या ब्रॅंड्सपैकी एक समजला जातो. ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाने (एआरएआय) प्रमाणित केलेली ही भारतातील पहिली एआयएस ११३ उत्पादन कंपनी आहे. याशिवाय कंपनीला त्यांच्या २५ प्रकारच्या ट्रेलर्ससाठी टीएस-१६९४९-२००९ आणि आयएसओ ९००१:२००८ प्रमाणपत्र प्राप्त झालेली आहेत.

टाटा इंटरनॅशनल डीएलटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव बत्रा म्हणाले, ‘भारतातील पहिला इंटेलिजंट ट्रेलर सादर करताना आम्हाला आनंद होत आहे. आम्ही बाजारात आणण्यास सज्ज आहोत अशा इंटेलिजंट ट्रेलर्सच्या मालिकेतील हा पहिला इंटेलिजंट फ्लॅटबेड ट्रेलर आहे. हे वजनाने हलके ट्रेलर्स अधिक भार वाहण्याच्या (पेलोड) दृष्टीने विकसित करण्यात आले असून, यामुळे नफ्याची शक्यता वाढते.’

‘बाजारपेठेतील आघाडीची कंपनी म्हणून, कोणतेही उत्पादन विकसित करताना नवकल्पना हा मुद्दा प्रमुख राहील असा आमचा प्रयत्न कायमच असतो. त्याचप्रमाणे आमच्या ग्राहकांना क्रांतीकारी उत्पादने विकसित करून देण्यासाठीही आम्ही प्रयत्नशील असतो. किंमत, दर्जा व डिलिव्हरी यांमध्ये स्पर्धात्मक लाभ ठेऊन ट्रेलर्स व वाहतूक उद्योगातील संपूर्ण सोल्युशन्स पुरवणारी कंपनी होण्याच्या उद्दिष्टाच्या दिशेने आमची वाटचाल सुरू राहील,’ असा विश्वास बत्रा यांनी व्यक्त केला.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search