Next
किड्स फॅशन शो
प्रेस रिलीज
Tuesday, July 11, 2017 | 12:14 PM
15 0 0
Share this article:

फलटण (सातारा) : शैक्षणिक गुणवत्तेला जोड देण्यासाठी ‘आयडियल किड्स, फलटण’ प्रस्तुत व पुणे येथील ‘झिरकॉन इव्हेंट मॅनेजमेंट’ आणि ‘व्हिव्हज फिनिशिंग स्कुल’ यांच्या संयुक्त विद्यमाने फलटण येथे किड्स फॅशन शोचे आयोजन करण्यात आले आहे.

मुलांमध्ये असलेल्या फॅशनच्या गुणांना वाव मिळण्यासाठी, त्याचबरोबर महाराष्ट्रासह देशात व परदेशात फॅशनिंग डिझाइनमध्ये चमकण्यासाठी याचे आयोजन केल्याची माहिती वैशाली शिंदे, विवेक पवार व आरती राय यांनी दिली.

या वेळी मिस्टर इंडिया विवेक पवार व पुणे येथील व्हूज फॅशनिंग डिझाइनर आरती राय यांनी सांगितले, ‘‘आयडियल किड्स’च्या शिक्षण संस्थेच्या चमकदार कामगिरी करणाऱ्या मुलांना शिक्षणाबरोबरच व्यक्तिमत्त्व विकास, तसेच त्यांच्यातील किड्स फॅशनबद्दलची माहिती दिली जाणार आहे. शिवाय मागदर्शन सराव करून घेऊन त्यांना महाराष्ट्रासह देशात व जगात किड्स पार्ट वर्क, मॉडेलिंग, बेबीज शो यांमध्ये चमकविण्यासाठीची माहिती आम्ही देणार आहोत. यासाठी वैयक्तिक मागर्दशन करण्यासाठी पुणे येथील या क्षेत्रात कार्यरत असलेली अनुभवी मंडळी यात सहभागी होणार असून, ३०० मुलांना यामध्ये सहभागी होता येणार आहे. यामधून ३० विद्यार्थ्यांना पारितोषिक मिळवण्याची संधी प्राप्त होणार आहे.’

यामध्ये चार वेगवेगळ्या वयोगटांतून निवड केली जाणार आहे. यात तीन ते सहा वयोगट, सात ते नऊ, १० ते १२ व १३ ते १५ वयोगटात हे पारितोषिक मिळणार आहे. त्याचबरोबर इतर सात वेगळी बक्षिसे मिळणार आहेत, यामध्ये बेस्ट स्माइल, बेस्ट रॅम्प वॉक, बेस्ट पर्सनॅलिटी, बेस्ट फॅशन आयकॉन, बेस्ट आयकॉन, मास्टर/मिस कॉन्फिडन्ट, मास्टर अँड मिस टॅलेंटेड, मास्टर अँड मिस फोटोजेनिक असे अॅवॉर्ड मिळणार आहेत. यासाठी परीक्षक म्हणून पुणे व मुंबई येथील मिसेस इंडिया वर्ल्डवाइड पूनम शिंदे, चीफ ऑफ मॅगझिन विद्या तिवारी, मॉडेल रूपाली कदम व कलाकार उपस्थित राहणार आहेत.  तसेच सर्व सहभागी मुलांना प्रमाणपत्र व बॅग भेट म्हणून देण्यात येणार आहे. यामधील उत्कृष्ट शो करणाऱ्या मुलांना पुढे फिल्म, टीव्ही सिरीयल, प्रिंट अॅड्ससाठी काम करण्याची संधी मिळू शकणार आहे. प्रथमच असा शो ग्रामीण भागात होत असल्याने आपल्या मुलांना याचा फायदा व्हावा यासाठी ‘आयडियल किड्स’च्या संस्थापक अध्यक्षा वैशाली शिंदे यांनी ही संधी उपलब्ध करून दिली आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Vaishalii Shinde About
Thank you so much
1
0

Select Language
Share Link
 
Search