Next
शेतकऱ्यांसाठी ‘खेतीगाडी डॉट कॉम’
प्रेस रिलीज
Tuesday, February 27 | 12:21 PM
15 0 0
Share this story

प्रवीण शिंदे, खेतीगाडीचे संस्थापकपुणे : ट्रॅक्टर आणि शेतीविषयक उपकरणांची खरेदी विक्री, तसेच ती भाड्याने देण्याची सुविधा असणारा जगातील पहिला व एकमेव जागतिक मंच म्हणजे खेतीगाडी. त्याच्या देशातील सेवेचे उद्घाटन पुण्यात करण्यात आले. ‘खेतीगाडी डॉट कॉम’ या नावाने असलेल्या या मंचाचा प्रमुख उद्देश आहे; शेतीच्या पद्धती अधिक कार्यक्षम करण्यासाठी योग्य ज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आधारे, शेतकऱ्यांना सक्षम बनवणे. 

शेतकरी आणि त्यांच्याशी संबंधित समाजाला पेलावी लागणारी आव्हाने समजून घेऊन, खेतीगाडीतर्फे त्यांना एकाच ठिकाणी सोपे, सोयीस्कर, सुकर आणि सर्व प्रकारचे उपाय पुरवले जातात. ते शेतकरी, उत्पादक, वितरक, कंत्राटदार अशा सर्वांच्या दृष्टीने परस्परांच्या उपयोगाचे ठरतात. खेतीगाडीच्या मंचावर सर्व ब्रँडचे, सर्व प्रकारचे, सर्व शक्तीचे आणि सर्व क्षमतेचे ट्रॅक्टर्स तसेच, शेतिविषयक उपकरणे उपलब्ध करून दिली जातात.

शेतकऱ्यांना तंत्रज्ञानावर आधारित शेतिविषयक उपकरणे वापरण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि त्यांना शेतीच्या पद्धतींमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात तंत्रज्ञानाचा वापर करायला लावणे, हे खेतीगाडीचे प्रमुख प्रयोजन आहे. त्यासाठी खेतीगाडीतर्फे शेतकऱ्यांना विविध उत्पादनांची सविस्तर माहिती पुरवली जाते. त्यांना त्याचा उपयोग योग्य उपकरणे खरेदी करण्यासाठी किंवा त्यांची विक्री करण्यासाठी होतो. या साधनांच्या वापरामुळे शेतकऱ्यांचे शारीरिक श्रम कमी करणे शक्य होते. खेतीगाडीला अशा साधनांचे सर्व प्रकारचे उत्पादक, खरेदीदार, विक्रेते, कंत्राटदार व  अशी उत्पादने भाड्याने देणारे अशा सर्व घटकांना एकमेकांच्या फायद्यासाठी एकाच मंचावर एकत्र आणण्यात यश आले आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link