Next
मेहतांच्या पुण्यतिथीनिमित्त भंडाऱ्याचे आयोजन
प्रेस रिलीज
Monday, November 06 | 05:59 PM
15 0 0
Share this story

जयवंती मेहतामुंबई : माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या जयवंती मेहता यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त भजन व भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे.

मेहता या मुंबईतील लढाऊ नेत्या म्हणून परिचित होत्या. भाजप विरोधी पक्ष असताना त्यांनी आक्रमकपणे संघर्ष केला. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रीमंडळात त्या मंत्री होत्या. पक्ष संघटनेत त्यांनी प्रदेश व राष्ट्रीय स्तरावर अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पडल्या.

या प्रसंगी उपस्थित राहावे, असे आवाहन भाजप प्रदेश प्रवक्ते व नगरसेवक अतुल शहा, आमदार राज पुरोहित, आमदार मंगलप्रभात लोढा, मुंबई भाजपचे महामंत्री सुनील राणे, दक्षिण मुंबईचे अध्यक्ष जयेश शहा, कुलाबा मंडल अध्यक्ष विश्वास म्हात्रे यांनी केले आहे.  

कार्यक्रमाविषयी :

दिवस : ७ नोव्हेंबर २०१७
वेळ : सायंकाळी पाच वाजता
स्थळ : कबुतर खान्याजवळ, भुलेश्वर, दक्षिण मुंबई.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link