Next
अंधत्वावर मात करून बँकेत नोकरी
रोपळे बुद्रुक येथील जिद्दी युवकाची कामगिरी
BOI
Friday, November 23, 2018 | 03:05 PM
15 0 0
Share this article:

अमोलला पेढा भरवताना आई आणि वडील.

सोलापूर :
रोपळे (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथील अमोल तानाजी पवार या युवकाने अंधत्वावर मात करून बँकेत नोकरी मिळविली आहे. बँक ऑफ इंडियामध्ये प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून त्याची निवड झाली आहे.
 
रोपळे गावातील शेतकरी तानाजी पवार यांचा मोठा मुलगा अमोल याला बालवयात मोतिबिंदू झाला होता; मात्र सुरुवातीच्या काळात त्याला चांगले दिसत होते. एका डोळ्यावर शस्त्रक्रिया केल्यामुळे त्याला डॉक्टरांच्या सल्ल्याने चष्मा वापरायला लागत होता; मात्र शाळेत त्याचा चष्मा सारखा फुटत होता. काही वेळा त्याच्याकडून घातलाही जात नव्हता. त्यामुळे त्याचा त्रास वाढतच गेला. दुसऱ्या डोळ्याचीही दृष्टी गेली. आता त्याच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करूनही काही उपयोग होणार नसल्याचे निदान डॉक्टरांनी केले. 

अमोल पवारत्याला सोलापूर येथील राजीव गांधी मेमोरियल स्कूलमध्ये घालण्यात आले. बारावीपर्यंत त्याचे शिक्षण तिथे झाले. त्यानंतर त्याने नाशिक येथे टायपिंग, एमएसआयटी व संगणकाचा बेसिक कोर्स पूर्ण केला. त्यानंतर त्याने अध्यापक होण्यासाठीचा कोर्सही केला; मात्र शिक्षकाची नोकरी मिळण्यात अनेक अडचणी निर्माण झाल्यावर त्याने ग्रॅज्युएशन पूर्ण केले. त्यानंतर पुणे येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात त्याने सहा महिन्यांचा अॅडिशनल कम्प्युटर नॉलेज कोर्स केला. त्याच वेळी त्याने बँकिंग परीक्षांची तयारी केली. या परीक्षेत पास झाल्यावर त्याची नुकतीच बँक ऑफ इंडियाच्या चाकण (पुणे) येथील शाखेत प्रोबेशनरी ऑफिसर या पदावर निवड झाली. 

नोकरी लागल्यावर तो पहिल्यांदाच घरी आला, तेव्हा त्याची आई लता व वडील तानाजी यांनी त्याला पेढा भरवून आनंद व्यक्त केला. दरम्यान, अमोल गावात आल्याची बातमी कळताच गावकऱ्यांनीही त्याचे अभिनंदन केले. सरपंच दिनकर कदम यांनी त्याचा गावकऱ्यांच्या वतीने सत्कार केला. 

‘दृष्टिहीन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी समाजाने आणि पालकांनी त्याचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी डोळस प्रयत्न केले, तर माझ्यासारख्या बांधवांचे जीवन सुखकर होण्यास मदत होईल,’ असे या वेळी अमोल पवार याने सांगितले.

(अमोलच्या मनोगताचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Popatlal About 175 Days ago
The Grate Work ."Wish,
1
0
Popat About 175 Days ago
Khupch Best.nyc.
0
0
Popat About 175 Days ago
Happy "Wish ; Amoal.
0
0
Popat About 175 Days ago
Wish;He Saw The Proof ,Nuthing Is Impossible.Realy He is Grate.Jay hind Jay Maharashtra.Vanday Matrum.
0
0
किशोर महामुनी About 175 Days ago
छानच मोहनराव🌷🌷
0
0
अशोक गायकवाड About 176 Days ago
खरोखर डोळस मानसानी आदर्श घेण्यासारखे आहे त्यंच्य जिद्दीला व चिकाटीला सलाम
0
0
Balasheb Bhosale About 176 Days ago
Amoal Tuja Amala Abiman Aahe Tula Subecha
0
0
डॉ प्रशांत कोल्हे About 176 Days ago
प्रेरणादायी ! खरोखर आदर्श घेण्यासारखे !! जिद्दीला सलाम !!!
0
0
Dinkar bkrde About 176 Days ago
Jiddi la salam
0
0

Select Language
Share Link
 
Search