Next
जोसेफ बार्बेरा
BOI
Saturday, March 24, 2018 | 03:45 AM
15 0 0
Share this story

जगभरातल्या आबालवृद्धांना निखळ आनंद देणाऱ्या '‘टॉम अॅन्ड जेरी, द फ्लिंटस्टोन्स, योगी बेअर, स्कूबी-डू, टॉप कॅट, द स्मर्फ्स, हकलबेरी हाउंड’ - सारख्या एकाहून एक धम्माल कार्टून्सचा निर्माता जोसेफ बार्बेराचा २४ मार्च हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणीमध्ये त्याचा अल्प परिचय.....
.............
२४ मार्च १९११ रोजी न्यूयॉर्कमध्ये जन्मलेला जोसेफ बार्बेरा हा आपल्या एकाहून एक अफलातून कार्टून्समुळे अवघ्या जगभरात प्रसिद्ध आहे. विल्यम हॅना या आपल्या मित्राबरोबर जोडी जमवून १९४० साली एमजीएम स्टुडियोसाठी त्यांनी निर्माण केलेल्या ‘टॉम अॅन्ड जेरी’ या दुक्कलीने जगभरच्या आबालवृद्धांना जे काही वेड लावलं ते आज ७८ वर्षांनंतरही तसंच कायम आहे! त्यांच्या बहुतेक कार्टून मालिकांमधून दोन मित्रांची किंवा भिडूंची दोस्ती मजेशीर प्रकारे आपल्यासमोर येते.  


पुढे एमजीएम स्टुडियोने अॅनिमेशन डीपार्टमेंट बंद केल्यावर दोन्ही मित्रांनी मिळून आपला स्वतःचा हॅना-बार्बेरा स्टुडियो चालू केला आणि तीन हजाराहून जास्त टेलीव्हिजन शोज बनवले. द फ्लिंटस्टोन्स, योगी बेअर, स्कूबी-डू, टॉप कॅट, द स्मर्फ्स, हकलबेरी हाउंड, द जेटसन्स, जॉनी क्वेस्ट, द मॅजीला गोरील्ला शो, सिक्रेट स्क्विरल शो  अशा एकाहून एक धम्माल कार्टून्सच्या मालिका सादर केल्या आणि त्या पाहता पाहता जगभरच्या बच्चेकंपनीच्या आवडत्या मालिका बनल्या. नव्वदच्या दशकात हॅना-बार्बेरा स्टुडियोची मालकी टाईम वॉर्नरकडे गेली. 

हॅनाच्या भागीदारीत बार्बेराने बनवलेल्या स्टुडियोच्या कार्टून फिल्म्सना सात अकॅडमी अवार्ड्स आणि आठ एमी अवार्ड्स मिळाली. बार्बेराच्या कौशल्याबद्दल बोलताना हॅना म्हणाला होता की,‘मी पाहिलेल्या इतर कोणत्याही आर्टीस्टपेक्षा बार्बेरा आपल्या चित्राद्वारे एखाद्या कॅरॅक्टरचा मूड आणि हावभाव अतिशय अचूक आणि जलद पकडू शकतो!’

१८ डिसेंबर २००६ रोजी लॉसएंजलीस मध्ये त्याचा मृत्यू झाला.

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link