Next
यक्षप्रश्न
BOI
Wednesday, January 30, 2019 | 10:19 AM
15 0 0
Share this article:

महाभारत, रामायण या महाकाव्यांविषयी, त्यातील व्यक्तिरेखांविषयी अनेकांनी लिहिले आहे. डॉ. शांत नाईक यांना यातील स्त्रियांचे जीवन अधिक भावले. वेदकाळानंतर स्त्रियांचे समाजातील स्थान, अबला व दुबळे असल्याची जाणीव सतत करून देत असल्याने रूढी-परंपरा, संस्कृतीच्या नावाखाली त्यांचे जीवन दबून जात असे. श्रीव्यास हे महाभारताचे कर्ते. त्यांच्या मातेच्या सत्यवतीच्या आयुष्यावर लेखिकेने ‘यक्षप्रश्न’ या कादंबरीमधून प्रकाश टाकला आहे.

अनेक खळबळजनक घटनांनी भरलेले सत्यवतीचे जीवन, त्या वेळची समाजव्यवस्था विशेषतः स्त्रीचे स्थान यातून ठळकपणे लक्षात आणून दिले आहे. तिचा अनौरस जन्म, अलौकिक सौंदर्याला देहदुर्गंधीचा मिळालेला शाप, पराशर मुनी, सम्राट शंतनू यांचे जीवनात आगमन, तिचे धैर्य, तिचा स्त्रीवाद यातून स्पष्ट केला आहे. भीष्म व तिचे रहस्यमय नाते, त्या काळातही नियोगविधीला समर्थन देणारी सत्यवतीची बाजू व्यक्त केली आहे. सत्यवतीप्रमाणेच अंबा, रेणुका, शकुंतला, दमयंती या पुराणकालीन स्त्रियांवरील अन्यायाच्या भावनेतून या कादंबरीचे लेखन झाले आहे.

पुस्तक : यक्षप्रश्न
लेखक : शांता नाईक
प्रकाशक : मॅजेस्टिक पब्लिशिंग हाउस
पाने : ६५४
किंमत : ५०० रुपये

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search