Next
डॉ. पूनावाला यांचा वॅक्सिन हिरो पुरस्काराने गौरव
प्रेस रिलीज
Wednesday, December 12, 2018 | 03:11 PM
15 0 0
Share this article:

अबुधाबी : सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे (एसआयआय) संस्थापक व पूनावाला ग्रुपचे अध्यक्ष डॉ. सायरस पूनावाला यांना पहिल्या वॅक्सिन हिरो पुरस्काराने गौरविण्यात आले. हा पुरस्कार ‘गावी’ या आंतरराष्ट्रीय संस्थेतर्फे सुरू करण्यात आला आहे. जागतिक पातळीवर ज्यांनी ‘गावी’चे ध्येय साध्य करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावून जगभरातील लाखो मुलांच्या संरक्षणात भागीदार झालेल्यांना हा पुरस्कार प्रदान देऊन सन्मानित केले जाते.

या प्रसंगी ‘गावी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सेठ बर्कले म्हणाले, ‘गावीच्या सुरुवातीपासूनच डॉ. पूनावाला हे या संस्थेच्या ध्येयाचे समर्थक आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली सिरम ही संस्था जगातील सर्वांत मोठी लसींची पुरवठादार बनली असून, आहे. यामुळे गोवर, घटसर्प व मेंदूज्वर यांसारख्या भयंकर आजारांपासून जगातील सर्व गरीब देशांमधील असंख्य मुलांना संरक्षण देण्यात मदत झाली आहे. ‘सिरम’च्या मदतीशिवाय ‘गावी’ला एवढा प्रभाव दाखविता आला नसता. त्यामुळे माझ्या मते पहिल्या वॅक्सिन हिरो पुरस्काराचे ते योग्य मानकरी आहेत.’

हा पुरस्कार स्वीकारताना डॉ. पूनावाला म्हणाले, ‘गेली पाच दशके सिरम इन्स्टिट्यूटने केलेल्या मानवतावादी कार्याची दखल घेतल्याबद्दल आम्ही ऋणी आहोत व हा पुरस्कार सिरम इन्स्टिट्यूच्या वतीने मी नम्रपणे स्वीकारतो. यामुळे मला आणि माझ्याबरोबर काम करणार्‍या माझ्या सहकार्‍यांना हे मानवतावादी काम पुढेही चालू ठेवण्यास बळ मिळेल; तसेच ‘गावी’ आणि जगभरातील संयुक्त राष्ट्रांच्या इतर संस्थांमार्फत किफायतशीर दरात लसी उपलब्ध करून देण्यात मदत होईल. त्यामध्ये विशेष करून न्यूमोनिया, अतिसार, मेंदूज्वर, एचपीव्ही व डेंग्यू यांसारख्या आजारांसाठी असलेल्या नवीन लसींचा समावेश आहे.’

डॉ. पूनावाला यांनी सिरम इन्स्टिट्यूटची स्थापना १९६६मध्ये केली आणि ही कंपनी आता जगात सर्वांत जास्त लसींचे उत्पादन करत आहे. ‘सिरम’तर्फे जगभरातील १७० देशांमधील लहान मुलांना दरवर्षी एक अब्जांहून अधिक लसींच्या डोसेसचा स्वस्त दरात पुरवठा केला जातो. ‘गावी’तर्फे दिल्या जाणार्‍या लसींपैकी ४० टक्के लसी या ‘सिरम’तर्फे पुरविल्या जातात. २०१६ ते २०२० या कालावधीमध्ये लहान मुलांना नऊ रोगांपासून संरक्षण देण्यासाठी सुरू केलेल्या लसीकरण कार्यक्रमांमध्ये ‘सिरम’तर्फे ५० कोटी डोसेस पुरविले जातील. या नऊ रोगांमध्ये गोवर, रुबेला, मेंदूज्वर, अतिसार, घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, ब-कावीळ व हिब यांचा समावेश आहे. ५० वर्षांत ‘सिरम’तर्फे विविध लसींचे १८ अब्जांहून जास्त डोसेस पुरविण्यात आले आहेत.

हा पुरस्कार अबुधाबी येथे ‘गावी’तर्फे आयोजित एका सोहळ्यात देण्यात आला. हा सोहळा ‘गावी’च्या प्रगतीचा आढावा व त्याचा जगातील सर्वांत गरीब देशांवर होणारा प्रभाव यासाठी आयोजित केलेल्या उच्चस्तरीय परिषदेचा एक भाग होता. २०१८अखेरीस ‘गावी’तर्फे ७०० दशलक्ष लोकांचे लसीकरण करण्यात येणार असून, जगातील पाच वर्षांखालील मुलांच्या मृत्यूदराचे प्रमाण कमी करण्यात मदत होईल.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search