Next
‘गोदरेज’तर्फे ‘फ्रीजर-कूलर कन्व्हर्ट’ श्रेणी सादर
प्रेस रिलीज
Saturday, May 26 | 04:25 PM
15 0 0
Share this story

मुंबई : घरगुती उपकरणांच्या क्षेत्रातील आघाडीवर असलेल्या आणि रेफ्रिजरेशन क्षेत्रातील आपल्या कौशल्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या भारतातील कंपन्यांपैकी गोदरेज अप्लायन्सेसने ‘फ्रीजर-कूलर कन्व्हर्ट’ श्रेणी सादर करत चेस्ट फ्रीजर पोर्टफोलिओचा विस्तार करत असल्याचे जाहीर केले आहे. सध्या भारतातील चेस्ट फ्रीजर बाजारपेठ बाराशे कोटी रुपयांची असून, देशाच्या उत्तर भागातील त्याची बाजारपेठ वेगाने वाढत आहे.

रिटेलर्स आणि दुकानदार चेस्ट फ्रीजरचा वापर फ्रोजन खाद्यपदार्थ आणि आइस्क्रीम यांबरोबरच शीतपेये व दुग्धजन्य उत्पादने थंड करण्यासाठी वापरतात हे लक्षात घेऊन हे नवे उत्पादन बनवण्यात आले आहे. गोदरेज हार्ड टॉप ‘फ्रीज-कूलर कन्व्हर्ट’मुळे ग्राहकांना फ्रीजरचे कूलरमध्ये आणि त्याउलट रूपांतर करता येते.

गोदरेज चेस्ट फ्रीजर्सची संपूर्ण श्रेणी भारतातील सर्वाधिक उर्जा कार्यक्षम, सर्वाधिक थंडावा देणारी, ४० टक्के ऊर्जा बचत करणारी आहे. आर२९० आणि आर६००ए अशा प्रकारच्या रेफ्रिजरंट्स ते भारतातील सर्वाधिक पर्यावरणपूरक रेफ्रिजरंट्स आहेत, कारण ते ओझोन अजिबात कमी करत नाही आणि पर्यायाने जागतिक तापमानवाढीचा धोका कमी होतो.

अधिक चांगल्या कामगिरीसाठी गोदरेज चेस्ट फ्रीजर्समध्ये विविध वैशिष्ट्यांचा समावेश करण्यात आला आहे. उदा. यातील डी-कूल तंत्रज्ञानामुळे जलद फ्रीजिंग आणि जलद गतीने तापमान कमी होते. सुपर इन्सुलेशनमुळे थंडावा दीर्घकाळ टिकतो, तर ट्रॉपिकल कॉम्प्रेसरमुळे भोवताली उच्च तापमान असले, तरी कार्यक्षमता चांगली राहाते. त्याशिवाय चेस्ट फ्रीजर्समध्ये ते सहज हलवता यावेत यासाठी ३६० अंशात फिरणारी रोटेशन चाके बसवण्यात आली आहे. उजळ अंतर्बाह्य सजावट आणि दर्जेदार ड्रेन रचना तसेच गंज लागू नये यासाठी झेडओपी तंत्रज्ञान आणि गंजप्रतिबंधक साचा यामुळे देखभाल करणे अतिशय सोपे जाते. गोदरेज चेस्ट फ्रीजर श्रेणीमध्ये ग्लास टॉपचा पर्यायही देण्यात आला आहे.

याविषयी गोदरेज अप्लायन्सेसचे व्यवसाय प्रमुख आणि कार्यकारी उपाध्यक्ष कमाल नंदी म्हणाले, ‘६० वर्षांपूर्वी भारतात पहिला रेफ्रिजरेटर सादर केल्यापासून आम्ही सातत्याने ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी विकास घडवून आणत आहोत आणि फ्रॉस्ट फ्री व डायरेक्ट कूल रेफ्रिजरेटरसाठी भारताच्या घराघरांत लोकप्रिय झालो आहोत. इतक्या वर्षांत आम्ही रेफ्रिजरेशन व त्याच्याशी संबंधित क्षेत्रांत कौशल्य मिळवले असून, सर्वाधिक ऊर्जा संवर्धन करणाऱ्या चेस्ट फ्रीजर्सपासून अधिकाधिक काळ थंडावा देणाऱ्या मेडिकल रेफ्रिजरेटरपर्यंतची उत्पादने सादर केली आहे. आमच्या चेस्ट फ्रीजर्सला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, येत्या काही महिन्यात आणखी उत्पादने सादर करून या विभागातील बाजारपेठेत दहा टक्के हिस्सा मिळवण्याचे उद्दिष्ट आहे.’

गोदरेज अप्लायन्सेसच्या चेस्ट फ्रीजर्सचे उत्पादन समूह प्रमुख राजिंदर कौल म्हणाले, ‘सर्वोत्तम डीप-फ्रीजिंग अनुभव देणारी आमची उत्पादने शंभर टक्के हरित आणि पर्यावरणपूरक आहेतच, शिवाय तितकीच चांगली कामगिरी बजावतात आणि ग्राहकासाठी सोयीस्कर ठरतात. ग्राहक अनुभव आणि या क्षेत्रातील कौशल्याच्या आधारे सर्वाधिक थंडावा आणि ४० टक्के अधिक ऊर्जा बचत म्हणजेच वर्षाला विजेच्या बिलांमध्ये तब्बल पाच हजार रुपयांची बचत करणारा नवा गोदरेज हार्ड टॉप फ्रीजर-कूलर सादर करताना आम्हाला अभिमान वाटत आहे. त्याशिवाय गोदरेज चेस्ट फ्रीजर पोर्टफोलिओ झेडओपी तंत्रज्ञानाद्वारे गंज मुक्त करण्यात आला असून, त्याच्या कॉम्प्रेसरवर पाच वर्षांची वॉरंटीही देण्यात आली आहे.’

गोदरेज चेस्ट फ्रीजर्सला गोदरेज स्मार्टकेअर सर्व्हिसच्या सेवेची जोड देण्यात आली आहे. गोदरेज स्मार्टकेअरचे सेवा नेटवर्क मोठ्या प्रमाणावर विस्तारलेले असून, त्यात ६६० सर्व्हिस केंद्रे, ४ हजार ५०० पेक्षा जास्त तंत्रज्ञ, १२ भाषांत कार्यरत राहाणारी २४x७ कॉल सेंटर्स, एका खेपेत उपाययोजना करून देण्यासाठी १६० स्मार्ट मोबाइल व्हॅन्स यांचा समावेश होतो. व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणावर ‘गोदरेज’चा वापर करणाऱ्या ग्राहकांना सक्षम विक्रीपश्चात सेवेमुळे मोठी मदत होते.
 
नवी उत्पादन श्रेणी १०० लिटर, २०० लिटर, ३०० लिटर, ४०० लिटर आणि ५१० लिटर अशा पाच क्षमतांमध्ये, सिंगल डोअर, हार्ड टॉप लिड्स आणि डबल डोअर प्रकारांत सादर करण्यात आली आहे. देशभरात उपलब्ध करण्यात आलेल्या या श्रेणीची किंमत १७ हजार ते ३६ हजार रुपये आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link