Next
‘उत्तम गुणवत्तेसाठी सकारात्मकता महत्त्वाची’
प्रेस रिलीज
Saturday, June 30, 2018 | 03:33 PM
15 0 0
Share this story

एमआयटीच्या फॅकल्टी ऑफ मॅनेजमेंटच्या स्वागत समारंभात बोलताना डॉ. उपिंदर धर. शेजारी डावीकडून प्रा. अंजली साने, डॉ रवीकुमार चिटणीस, गिरेश कुलकर्णी, डॉ. मुरुगानंत, मंदार कोठोस्कर, प्रा. राहुल कराड, डॉ. आय. के. भट.

पुणे : ‘अभ्यासक्रमाबरोबरच अवांतर गोष्टींमधील सहभाग, नव्या गोष्टी आत्मसात करण्याची जिद्द, सकारात्मक दृष्टी, नियोजन, कठोर परिश्रम या जोरावरच उत्तम गुणवत्ता संपादित करता येते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पदवीच्या तीन वर्षांत उत्तम सादरीकरण करीत आपले करिअर घडवावे,’ असा कानमंत्र इंदोर येथील श्री वैष्णव विद्यापीठ विश्वविद्यालयाचे कुलगुरू डॉ. उपिंदर धर यांनी विद्यार्थ्यांना दिला.

डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी विश्वशांती विद्यापीठाच्या फॅकल्टी ऑफ मॅनेजमेंट आयोजित स्वागत समारंभात ते  बोलत होते. कोथरूड एमआयटी प्रांगणातील स्वामी विवेकानंद सभागृहात झालेल्या कार्यक्रमावेळी इस्कॉनचे  बाल गोविंद प्रभू, आयबीएमचे वरिष्ठ अधिकारी मंदार गोठोस्कर, इन्व्हेस्टमेंट वर्ल्डवाइडचे गिरेश कुलकर्णी, एमआयटी शिक्षणसंस्था समूहाचे उपाध्यक्ष प्रा. राहुल विश्वनाथ कराड, डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आय. के. भट, प्र-कुलगुरू डॉ. मुरुगानंत, कुलसचिव दीपक आपटे, फॅकल्टी ऑफ मॅनेजमेंटचे अधिष्ठाता डॉ. रवीकुमार चिटणीस, प्रा. अंजली साने यांच्यासह प्राध्यापक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. धर म्हणाले, ‘शिकणे ही चिरंतर प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत जीवनाची मूल्येही रुजवायला हवीत. उत्तम आणि दर्जेदार सादरीकरण करण्याचे आपले ध्येय असावे. शैक्षणिक, आर्थिक प्रगतीबरोबर मानसिक समाधान मिळेल, यावरही आपण लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.’

फॅकल्टी ऑफ मॅनेजमेंटच्या स्वागत समारंभात डावीकडून डॉ. रवीकुमार चिटणीस, गिरेश कुलकर्णी, डॉ. मुरुगानंत, मंदार कोठोस्कर, प्रा. राहुल कराड, डॉ. आय. के. भट, डॉ. उपिंदर धर, बाल गोविंद प्रभू, दीपक आपटे.प्रा. राहुल कराड म्हणाले, ‘विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, या उद्देशाने इंडस्ट्री-अॅकॅडमी यांच्यातील संबंध दृढ करण्यावर आम्ही भर देतो. सृजनशील मनांना रचनात्मक काम करण्यासाठी एमआयटी गेली साडेतीन दशके प्रेरित करीत आहे.’

बाल गोविंद म्हणाले, ‘चांगली संगत, पुस्तके यांच्याशी आपली गट्टी जमवावी. योग्य आहार आणि सतत व्यग्र राहण्याला प्राधान्य हवे. त्यासह मनःशांतीसाठी ध्यान करावे. मूल्याधिष्ठित शिक्षण अंगीकारावे. त्यातूनच एक प्रगल्भ आणि राष्ट्रप्रेमी नागरिक तयार होतो.’

डॉ. भट म्हणाले, ‘एमआयटीत आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांचे आयुष्य घडविण्यासाठी प्रयत्न होतो. व्यक्तिमत्त्व विकासावर भर देऊन एक चांगला भारतीय नागरिक घडविण्याची संस्थेची परंपरा आहे.’

गिरीश कुलकर्णी, मंदार गोठोस्कर, डॉ. मुरुगानंत, दीपक आपटे यांनी विचार मांडले. डॉ. रवीकुमार चिटणीस यांनी स्वागत प्रास्ताविक केले. प्रा. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. अंजली साने यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link