Next
‘नाट्यछटा स्पर्धेतून समाजाचे प्रतिबिंब पहायला मिळते’
दिवाकर स्मृती नाट्यछटा स्पर्धेचा निकाल जाहीर
प्रेस रिलीज
Monday, July 30, 2018 | 05:41 PM
15 0 0
Share this article:

दिवाकर स्मृती नाट्यछटा स्पर्धेतील विजेत्यांसह लीनता माडगूळकर आंबेकर, डॉ. दिलीप गरुड, नाट्यसंस्कार कला अकादमीचे प्रमुख विश्वस्त प्रकाश पारखी आदी मान्यवर

पुणे :  ‘लहान मुलांच्या भावविश्वातील गमतीदार गोष्टी, तसेच छोट्या-छोट्या प्रसंगातून रंजक नाट्य, मर्म विनोद यांचा सुंदर मिलाप नाट्यछटेत पहायला मिळाला. समाजामधील विविध घटकांतील समस्यादेखील मुलांनी मांडल्या. अनेक व्यक्तींच्या भुमिका रंगमंचावर जिवंत करण्याची ताकद नाट्यछटा कलाकारांमध्ये असते. त्यामुळे नाट्यछटेतून समाजाचे प्रतिबिंब पहायला  मिळाले’, असे मत  लेखिका लीनता माडगूळकर आंबेकर यांनी व्यक्त केले.

नाट्यसंस्कार कला अकादमी आयोजित कै. दिवाकर स्मृती नाट्यछटा स्पर्धेतील बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या. लीनता माडगूळकर आंबेकर, डॉ. दिलीप गरुड यांच्या हस्ते या स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. संस्थेचे माजी विद्यार्थी अभिनेते चिन्मय पटवर्धन यांचा विशेष सत्कार या वेळी करण्यात आला.  स्पर्धा प्रमुख अनुराधा कुलकर्णी, संस्थेच्या विश्वस्त दिपाली निरगुडकर उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संध्या कुलकर्णी यांनी केले.

कै. दिवाकर स्मृती नाट्यछटा स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत सुमारे ५०० च्या वर स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेची प्राथमिक फेरी सात  वेगवेगळ्या गटात झाली. यामध्ये शिशुगटापासून ते तरुण आणि जेष्ठांच्या गटाचा समावेश होता. प्राथमिक फेरीतून ९५ नाट्यछटा अंतिम फेरीत पोहचल्या होत्या. स्पर्धेची प्राथमिक फेरी  पुण्यातील सात  केंद्रांवर पार पडली. यंदा स्पर्धेचे २७ वे वर्ष होते.
 
या वेळी नाट्यसंस्कार कला अकादमीचे प्रमुख विश्वस्त प्रकाश पारखी म्हणाले, ‘नाट्यछटा हा प्रकार सध्या केवळ मराठीत नाट्यसंस्कार कला अकादमीनेच सुरु ठेवलेला आहे. दिवाकरांच्या नाट्यछटा आजच्या आणि पुढच्या पिढीलाही प्रेरणादयी ठरतील, व्यक्तिमत्व विकासाला सहाय्यभूत होतील,या विचाराने १९९२ पासून नाट्यसंस्कार कला अकादमीने कै.दिवाकरांच्या स्मृतिदिनानिमित्ताने “कै. दिवाकर स्मृती नाट्यछटा स्पर्धा घेण्यास सुरुवात केली. गेली २७ वर्षे ती अखंड सुरू आहे.’ 
 
स्पर्धेचा निकाल याप्रमाणे : 

शिशु गट : प्रथम - आरोही भामे, द्वितीय - अन्वित हर्डीकर, तृतीय - ओजस बापट,  उत्तेजनार्थ - वेदिका ओक
इयत्ता पहिली, दुसरी  : प्रथम - श्रीजय देशपांडे, द्वितीय - अर्णव कालकुंद्री, तृतीय – पूर्वजा शिंदे, उत्तेजनार्थ- कृतिका जोशी, अक्षरा करकरे
इयत्ता तिसरी, चौथी  : प्रथम - निषाद साने, द्वितीय - स्वरूपा झांबरे, तृतीय - पल्लवी माने, उत्तेजनार्थ- सई भोसले, विहान देशमुख, सनत देशपांडे
इयत्ता पाचवी, सहावी : प्रथम - ऋचा जाधव, द्वितीय - सई गुरव, तृतीय - अद्वैत राईलकर, उत्तेजनार्थ - सई आपटे, मुग्धा जोशी, स्वरांजली पाटील
इयत्ता सातवी आठवी  : प्रथम - अनुष्का जिरेकर, द्वितीय - ओजस दीक्षित, तृतीय - राही बिरादार
इयत्ता नववी,दहावी : प्रथम - चिराग बोरगावकर, द्वितीय - एंजल लोंढे
खुला गट : प्रथम - विद्या ढेकाणे, द्वितीय - अथर्व आगाशे

लेखन विभाग:
पालक : सायली देशमुख, समीर कुलकर्णी
शिक्षक : दीप्ती असवडेकर
विद्यार्थी: ईश्वरी थत्ते, मुग्धा देशपांडे, उत्तेजनार्थ - संचिता मोहोळ
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search