Next
नवी मुंबई पर‍िसरातील स‍िडकोअंतर्गत गावांना अभय योजना मंजूर
प्रेस रिलीज
Tuesday, May 28, 2019 | 04:14 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : नवी मुंबई पर‍िसरात येणारी स‍िडको प्रशास‍ित गावे आण‍ि शासकीय नळ जोडणीधारकांच्या पाणी देयकांचे विलंब शुल्क माफ करून, मूळ पाणीपट्टीची रक्कम तीन मासिक टप्प्यांमध्ये व सहा महिने कालावधीमध्ये भरण्याची ‘अभय योजना’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केली आहे.

स‍िडको क्षेत्रातील गावे आण‍ि शासकीय नळ जोडणीधारक यांच्याकडील थकित पाणीपट्टीची रक्कम वसूल करण्यासाठी कार्यवाही करण्यात येत होती. यामध्ये काही ग्राहकांकडून थकित रक्कम स‍िडकोकडे जमादेखील झाली आहे; मात्र अद्यापही काही थकबाकीदारांनी रक्कम भरलेली नाही. नवी मुंबईतील नवीन पनवेल, काळुंद्रे, कळंबोली, नावडे, करंजाडे, कामोठे, खारघर, द्रोणागिरी, उलवे तसेच आजुबाजूची गावे मिळून मार्च २०१८अखेर ८६ कोटी ८० लाख रुपये थकित आहेत. त्यापैकी ग्रामपंचायत व सरकारी कार्यालयांकडे यातील ४२ कोटी ६१ लाखांची रक्कम थकित आहे. त्यातील १६ कोटी ७८ लाखांची रक्कम ही विलंब शुल्क आहे, तर २५ कोटी ८३ लाख रुपये ही मूळ रक्कम आहे.

दरम्यान, थकित रक्कम भरताना विलंब शुल्क माफ करावे, अशी मागणी काही ग्रामपंचायत व सरकारी कार्यालयांनी केली आहे. त्यानुसार स‍िडको संचालक मंडळाने प्रस्ताव तयार करून त्यास मान्यता दिली आहे. हा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आला होता. या प्रस्तावास मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search