Next
‘महिंद्रा’च्या पर्यावरणस्नेही डिजिटल अभियानाची सुरुवात
प्रेस रिलीज
Friday, March 01, 2019 | 11:51 AM
15 0 0
Share this story

मुंबई : महिंद्रा ग्रुपने नुकताच एका नवीन डिजिटल अभियानाला सुरुवात केली असून, वृक्षारोपणाचा संदेश देणाऱ्या या नवीन डिजिटल कॅम्पेनमध्ये वातावरणातील बदलांना रोखण्यासाठी एकजूट होण्यासाठी लोकांना प्रेरित केले जात आहे. '#RiseAgainstClimateChange' यावर लघुपट चित्रित करण्यात आला आहे.

महिंद्रा राइजच्या सर्व डिजिटल चॅनेल्सवर या अभियानाची सुरुवात होत आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे अभियान पोहोचावे यासाठी सोशल मीडियावर वेगवेगळे कार्यक्रम, स्पर्धा, पर्यावरण सुरक्षेमध्ये उत्तम कामगिरी बजावणाऱ्या एन्व्हायरन्मेंट चॅम्पिअन्सचा सन्मान, काही निवडक स्वयंसेवी संस्थांसोबत आपापल्या भागांमध्ये सक्रिय होण्यासाठी लोकांना संधी मिळवून देणे असे कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.    

महिंद्रा ग्रुपचे ग्रुप कॉर्पोरेट ब्रँडचे चीफ मार्केटिंग ऑफिसर विवेक नायर म्हणाले, ‘महिंद्रा हा सामाजिक जबाबदारीचे पुरेपूर भान असलेला विश्वसनीय ब्रँड आहे. आमच्या ‘राइज’ धोरणातून आम्ही समाजाचे कल्याण करण्याबरोबरीनेच लोकांनाही चांगल्या गोष्टींसाठी एकजूट होण्यासाठी प्रेरित करत आहोत, जेणेकरून सकारात्मक सामाजिक परिवर्तन घडून येऊ शकेल. आज संपूर्ण जगभरात या समस्येवर खूप बोलले जात आहे, आमची ही फिल्मदेखील पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत आहे.’

‘या अभियानात आम्ही पर्यावरणाची दुर्दशा हा मुद्दा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवत आहोत. आमची अशी इच्छा आहे की, मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करून या मुद्द्यावर लोकांची एकजूट व्हावी. आमचा हा संदेश अधिक जास्त प्रभावी होण्यसाठी आमच्या या फिल्मचे सेट्स पुनःप्रक्रिया केलेल्या रद्दी कागदांपासून बनवले गेले आहेत जेणेकरून आमच्या या संदेशातून प्रत्येक बाबतीत पर्यावरणाचे संरक्षण केले जावे,’ अशी माहिती नायर यांनी दिली.

या फिल्ममधे अॅनिमेशनचा उपयोग केला गेला आहे.  यातील संपूर्ण सेट व प्रत्येक गोष्ट पुनःप्रक्रिया करण्यात आलेल्या कागदापासून बनवली गेली आहे. हायवे, पूल, कारखाने, झाडे, इतकेच नव्हे तर, धुरदेखील कागदापासून बनवला आहे. चित्रे व त्यापाठोपाठ येणारे व्हॉइसओव्हर याद्वारे माणसाने पर्यावरणावर केलेल्या नकारात्मक परिणामांना दाखवले गेले आहे व दुसऱ्या बाजूला आपल्याला दिसतात ती शांत व विनम्र झाडे जी निरंतर कठोर प्रयत्न करत पर्यावरणाला स्वच्छ राखत असतात. फिल्मचे काम पूर्ण झाल्यावर पुनःप्रक्रिया केलेल्या कागदापासून तयार करण्यात आलेले सर्व सेट्स तोडून या अभियानाच्या संदेशाचे पुरेपूर पालन करत त्यापासून खतनिर्मिती करण्यात आली.  

अभियानाचा उद्देश व मूळ संकल्पना याबाबत माहिती देताना महिंद्रा अँड महिंद्राचे उपाध्यक्ष समूह सीएसआर सुशील सिंह म्हणाले, ‘महिंद्रा समूह गेल्या कित्येक वर्षांपासून विविध उपक्रमांच्या माध्यमातून वातावरणातील बदलांवर उपाययोजना करत आहे. आमच्या हरियाली उपक्रमातून १५ मिलियनपेक्षा जास्त झाडे लावली गेली आहेत. आपण सर्व एकजूट होऊन सकारात्मक परिवर्तन घडवून आणू शकतो व आम्हाला खात्री आहे की, ही फिल्म माहिती देण्याबरोबरीनेच लोकांना सक्रिय होण्यासाठीदेखील प्रेरणा देईल.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link