Next
स्माइल कोच
BOI
Wednesday, February 13, 2019 | 10:25 AM
15 0 0
Share this story

माणसाच्या मुलभूत गरजांच्या यादीत आता मोठी वाढ झालेली दिसते. अन्न, वस्त्र, निवारा या पलीकडे अलिशान घर, मोटार, भरभक्कम बँक बॅलन्स, ब्रँडेड गोष्टी अशी भर त्यात पडतच असते., पण आनंद, समाधान यापासून तो दूर जातो; मात्र ताण न घेता आनंदी, हसतमुख राहण्याचे टॉनिक डॉ. सागर गोपाळे यांनी ‘स्माइल कोच’मधून दिले आहे.

स्मितहास्यामुळे होणारे सकारात्मक परिणाम, भावनेवर नियंत्रण ठेवून निर्णय घेणे योग्य कसे ठरते, प्रभावी व्यक्तिमत्वामुळे निर्माण होणारे स्नेहबंध, वस्तुस्थिती स्वीकारण्याचे फायदे याबद्दल त्यांनी सांगितले आहे. आयुष्यात जे मिळाले त्याबद्दल किंवा निसर्ग, व्यक्तींबद्दल कृतज्ञता बाळगणे, भविष्यातील संधींसाठी तत्पर राहणे आदीमधून समाधानी जीवन कसे जगता येते हे उदाहरणांसह दाखवून दिले आहे. प्रत्येक प्रकरणानंतर प्रात्यक्षिकासाठी तक्ताही दिला आहे. आनंदी जीवनाच्या सात सूत्रांचा अवलंब करून ‘हसा आणि सुखांना आकर्षित करा’ असा संदेश त्यांनी दिला आहे.    
 
पुस्तक : स्माइल कोच- आनंदी जीवनाची सात सूत्रे
लेखक : सागर गोपाळे
प्रकाशक : स्माइल कोच पब्लिकेशन
पाने : ११५
किंमत : १४९ रुपये

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link