Next
सेनेचा भाजपला टोला, बिहारप्रमाणे देशातही ‘परिवर्तन’ होईल;
BOI
Saturday, February 04, 2017 | 12:00 AM
15 0 0
Share this article:


उद्धव यांनी भाजपशी युती तोडल्याचे जाहीर केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत परिवर्तन होणारच, असा नारा देत सेनेला प्रतिआव्हान दिले होते. मुख्यमंत्र्यांच्या याच वक्तव्याचा धागा पकडत सेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून भाजपवर खोचक टीका करण्यात आली आहे. देशातील जनतेलाच पुन्हा परिवर्तन हवे असून गेल्यावर्षीच्या बिहारमधील निकालांनी परिवर्तनाची दिशा दाखवली आहे, असे सांगत सेनेने भाजपला डिवचले आहे.
देशाच्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांपैकी पंजाब आणि गोव्यात आज मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने परिवर्तनाची भाषा करणाऱ्या भाजपला टोमणे मारले आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून या पाच राज्यांच्या निवडणुकीकडे पाहिले जात आहे. त्याचा पहिला ‘अंक’ आज पंजाब आणि गोव्यात पार पडेल आणि राष्ट्रीय राजकारणाच्या ‘परिवर्तना’ची ती नांदी ठरेल. नाही तरी सध्या सत्ताधारी मंडळींचे ‘परिवर्तन’ या शब्दावर जरा जास्तच प्रेम जडले आहे. ‘च’वर जोर वगैरे देत त्यांच्या परिवर्तनाच्या बैठका मारणे सुरू आहे. मात्र मुळात आता देशातील जनतेलाच पुन्हा परिवर्तन हवे आहे. गेल्या वर्षी बिहारमधील निकालांनी या परिवर्तनाची दिशा दाखवली आहे. पाच राज्यांतील मतदानाची ‘सप्तपदी’ त्यावर शिक्कामोर्तब करील. पंजाब आणि गोव्यातील मतदार आज या परिवर्तनाचे पहिले पाऊल टाकतील याबद्दल आमच्या मनात तरी शंका नाही, असे अग्रलेखात म्हटले आहे. शिवसेनेच्या या टीकेला भाजपकडून राज्यातील महापालिका निवडणुकांच्या प्रचारादरम्यान प्रत्युत्तर दिले जाण्याची शक्यता आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search