Next
डॉ. सप्तर्षींच्या पुस्तकाचे प्रकाशन नऊ ऑगस्ट रोजी
प्रेस रिलीज
Friday, August 03 | 04:40 PM
15 0 0
Share this story

पुणे : युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी लिखित ‘येरवडा विद्यापीठातील दिवस’ या पुस्तकाच्या तिसर्‍या आवृत्तीचे प्रकाशन क्रांती दिनी म्हणजेच नऊ ऑगस्टला ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांच्या हस्ते होणार आहे.

महाराष्ट्र गांधी स्मारक निधी, युवक क्रांती दल आणि प्रफुल्लता प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने होणार्‍या या  कार्यक्रमाची माहिती डॉ. सप्तर्षी यांनी पत्रकार परिषदेत दिली. तिसरी आवृत्ती प्रफुल्लता प्रकाशन यांनी प्रकाशित केली आहे.

१९७० च्या दशकात डॉ. सप्तर्षी यांना अनेक सामाजिक आंदोलनानंतर तुरुंगवास भोगावा लागला. तुरुंगवास ही इष्टापत्ती मानून डॉ. सप्तर्षी यांनी तुरुंगात घेतलेले अनुभव, वाचन, चर्चा आणि त्यांचा आयुष्यावर झालेला परिणाम याबाबतचे लेखन ‘येरवडा विद्यापीठातील दिवस’ या पुस्तकात आहे.

क्रांती दिन आणि युवक क्रांती दलाच्या १७व्या स्थापना दिनाचे औचित्य साधून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या वेळी माजी कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले हे या पुस्तकाबाबत आपले विचार व्यक्त करणार आहेत.

दरम्यान, दोन ऑक्टोबर २०१८पासून महात्मा गांधीजींच्या जन्माला १५० वर्ष होत आहेत. त्यानिमित्त भारतीय स्वातंत्र्यलढा आणि गांधीजींच्या कार्याशी संबंधित ठिकाणांना भेट देणारी यात्रा काढली जाणार आहे. महाराष्ट्र गांधी स्मारक निधीतर्फे या यात्रेचे आयोजन केले जाणार आहे, अशी माहिती या वेळी देण्यात आली.

पत्रकार परिषदेला महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे सचिव अन्वर राजन, रवी लाटे, नितीन शास्त्री उपस्थित होते.

प्रकाशन सभारंभाविषयी :
दिवस :
गुरुवार, नऊ ऑगस्ट २०१८
वेळ : सायंकाळी सहा वाजता
स्थळ : टिळक स्मारक मंदिर, पुणे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link