Next
महिंद्राच्या ‘एक्सयूव्ही 300’ला उदंड प्रतिसाद
अल्पावधीतच १३ हजारपेक्षा जास्त नोंदणी
BOI
Friday, March 15, 2019 | 04:12 PM
15 0 0
Share this article:


मुंबई : महिंद्रा अँड महिंद्रा लि. (एमअँडएम) कंपनीने, अलीकडेच दाखल केलेल्या स्टायलिश ‘एक्सयूव्ही 300’ या कॉम्पॅक्ट एसयूव्हीसाठी १३ हजारपेक्षा जास्त नोंदणी झाली आहे. एसयूव्ही क्षेत्रामध्ये कॉम्पॅक्ट एसयूव्हीचा हिस्सा ४० टक्के असून, गेल्या पाच वर्षांमध्ये ही श्रेणी अत्यंत वेगाने वाढली असल्याचे स्पष्ट झाले आहे. 


नव्या एसयूव्हीला मिळालेल्या उत्साहवर्धक प्रतिसादाबाबत बोलताना, महिंद्रा अँड महिंद्रा लि.च्या ऑटोमोटिव्ह डिव्हिजनचे सेल्स व मार्केटिंग प्रमुख विजय राम नाकरा म्हणाले, ‘‘एक्सयूव्ही 300’ ला भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. कॉम्पॅक्ट एसयूव्हीसारख्या अत्यंत स्पर्धात्मक श्रेणीमध्ये १५ ते २० टक्के  हिस्सा मिळवण्याच्या आमच्या उद्दिष्टानुसार, पहिल्याच महिन्यात १३ हजारपेक्षा अधिक नोंदणी झाल्यामुळे आघाडीच्या तीन कंपन्यांमध्ये स्थान मिळवले आहे. तसेच, ग्राहकांनी ‘एक्सयूव्ही 300’ ला पसंती दर्शवली असल्याचे अधोरेखित केले आहे. ७५ टक्क्यांहून अधिक नोंदणी टॉप एंड मॉडेलसाठी झाले आहे,हेही उल्लेखनीय आहे. चित्त्यापासून प्रेरित डिझाइन, थरारक कामगिरी, या श्रेणीतील सुरक्षेची सर्वोत्तम वैशिष्ट्ये व उत्कृष्ट इंटिरिअर या वैशिष्ट्यांमुळे ग्राहकांकडून व ऑटो तज्ज्ञांकडून या एसयूव्हीने मोठी पसंती मिळवली आहे.’ 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search