Next
‘अप्पलाउड’ स्वयंसेवी संस्थेला राष्ट्रीय सेवा गौरव पुरस्कार
प्रेस रिलीज
Friday, May 03, 2019 | 03:19 PM
15 0 0
Share this article:

‘अप्पलाउड’ स्वयंसेवी संस्थेला मिळालेला पुरस्कार राहुल कोटगळे आणि संगीता शेट्ये यांनी स्वीकारला.पुणे : ‘तृतीयपंथीयांच्या सबलीकरणासाठी संस्थेच्या अनुकरणीय योगदानासाठी असोसिएशन ऑफ इंडियन जर्नालिस्टच्या वतीने ‘अप्पलाउड’ स्वयंसेवी संस्थेला राष्ट्रीय सेवा गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले,’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक ऱ्हिदम वाघोलीकर यांनी दिली.  

हा कार्यक्रम नाशिक येथे झाला. या वेळी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील आणि कलाकार अभिजित खांडेकर यांनादेखील सन्मानित करण्यात आले. तृतीयपंथीयांच्या समस्या आणि सबलीकरणासाठी ‘अप्पलाउड’ ही संस्था ऱ्हिदम वाघोलीकर यांनी सुरू केली आहे. या संस्थेच्या अध्यक्ष तृतीयपंथी कार्यकर्त्या गौरी सावंत असून, सचिव संगीता शेट्ये, खजिनदार प्रतीक रोकडे आणि राहुल कोटगळे हे संपर्क प्रमुख आहेत. 

तृतीयपंथींच्या समोरील शैक्षणिक आव्हाने, समस्या आणि संक्रमणासाठी उपाय योजना हे प्रमुख उद्दिष्ट समोर ठेऊन ही संस्था स्थापन करण्यात आल्याचे वाघोलीकर यांनी सांगितले. 

‘‘अप्पलाउड’च्या माध्यमातून तृतीयपंथी समाजाला सक्षम, प्रेरित करणे आणि त्यांना सामान्य जीवन जगण्यास मदत केली जाते; तसेच ही स्वयंसेवी संस्था त्यांना सुशिक्षित करणे, सामाजिक स्वीकृतीचा हक्क मिळवून देणे, विविध कंपन्या आणि तृतीयपंथी यांच्यातील दुवा होऊन त्यांना नोकरी मिळवून देण्यासाठी मदत करण्याचे कार्य करत आहे; तसेच तृतीयपंथी आणि समाज यांच्यात सामाजिक बांधिलकी निर्माण होण्यासाठी संस्था विविध कार्यक्रमांचे आयोजन करत आहे,’ असे गौरी सावंत यांनी सांगितले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search