Next
‘बनावट प्रमाणपत्रांना ‘युडीआयएन’मुळे बसणार आळा’
सीए एस. बी. झावरे यांची माहिती
प्रेस रिलीज
Monday, February 11, 2019 | 04:46 PM
15 0 0
Share this article:

दीपप्रवज्वलनप्रसंगी डावीकडून सीए ऋता चितळे, सीए समीर लड्ढा, सीए रणजितकुमार अगरवाल, सीए एस. बी. झावरे, सीए चंद्रशेखर चितळे, सीए अभिषेक धामणे.

पुणे : ‘सनदी लेखापालांकडून दिली जाणारी प्रमाणपत्रे अधिकृत आहेत, याची खात्री करण्यासाठी या प्रमाणपत्रांवर युनिक डॉक्युमेंट आयडेंटिफिकेशन नंबर (युडीआयएन सक्तीचा केला जाणार आहे. त्यामुळे येत्या आर्थिक गैरप्रकार रोखण्यासाठी, तसेच सीएचे बनावट प्रमाणपत्र तयार करण्याला आळा बसेल,’ अशी माहिती दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) केंद्रीय समितीचे सदस्य सीए एस. बी झावरे यांनी दिली.

‘आयसीएआय’ पुणे शाखेच्या प्रोफेशनल डेव्हलपमेंट कमिटीतर्फे ‘युडीआयएन- प्रमाणपत्र सुरक्षेचा मार्ग’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन केले होते. त्यानंतर सीए झावरे पत्रकारांशी बोलत होते. या प्रसंगी दिल्ली येथील प्रोफेशनल डेव्हलपमेंट कमिटीचे चेअरमन रणजितकुमार अगरवाल, सीए चंद्रशेखर चितळे, पुणे शाखेच्या उपाध्यक्षा ऋता चितळे, खजिनदार अभिषेक धामणे, सीए शशिकांत बर्वे, सीए समीर लड्ढा, अमृता कुलकर्णी आदी उपस्थित होते.

झावरे म्हणाले, ‘गेल्या काही वर्षांत सनदी लेखापालांची बनावट प्रमाणपत्रे तयार केल्याचे आढळले आहे. हे रोखण्यासाठी ‘युडीआयएन’ प्रणाली विकसित केली आहे. प्रमाणपत्र देताना संकेतस्थळावर जाऊन माहिती भरल्यानंतर हा क्रमांक मिळेल. तो क्रमांक प्रत्येक प्रमाणपत्रावर टाकणे अत्यावश्यक आहे. हा क्रमांक नसल्यास ते प्रमाणपत्र अधिकृत धरले जाणार नाही; तसेच संबंधित सीएवर कारवाईही होऊ शकते. ‘सीएने दिलेले प्रमाणपत्र अधिकृत आहे की नाही, ग्राहक अथवा संबंधित पक्ष तपासू शकतो. ‘युडीआयएन’ क्रमांक टाकून पडताळणी करता येईल. सर्टिफिकेट ऑफ प्रॅक्टिस (सीओपी) असलेल्या सीएंनाच या संकेतस्थळावर जाऊन प्रमाणपत्र देण्यासाठी नोंदणी करता येणार आहे.’

पत्रकार परिषदेत बोलताना डावीकडून सीए अभिषेक धामणे, सीए चंद्रशेखर चितळे, सीए एस. बी. झावरे, सीए शशिकांत बर्वे.

‘‘युडीआयएन’साठी कोणतेही नोंदणी शुल्क नाही. ‘युडीआयएन’ क्रमांक घेणे एक फेब्रुवारीपासून अनिवार्य आहे; तसेच जीएसटी ऑडिट आणि टॅक्स ऑडिट प्रमाणपत्रांसाठी हे कालांतराने लागू होणार आहे. त्यामुळे यापुढे सर्व सीओपी सीएना युडीआयएन घेणे बंधनकारक आहे. सध्या देशात केवळ तीन लाख सीए असून, त्यातील अवघ्या एक लाख १० हजार लोकांनाच ‘सीओपी’ आहे,’ अशी माहिती झावरे यांनी दिली.

चितळे म्हणाले, ‘सीएच्या नावाने बनावट प्रमाणपत्र तयार करण्याचे प्रकार रोखण्यासाठी ‘युडीआयएन’ हे क्रांतिकारी पाऊल आहे. प्रमाणपत्रांची सत्यता बँक, प्राप्तिकर विभाग, सेबी व तत्सम नियंत्रण संस्था पडताळू शकणार आहेत. ही प्रणाली पुण्यातील सीए एस. बी. झावरे यांच्या कल्पनेतून झाली आहे, याचा आनंद वाटतो.’

सीए अभिषेक धामणे यांनी या कार्यशाळेच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. सीए समीर लड्ढा यांनी सूत्रसंचालन केले. अमृता कुलकर्णी यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search